Join us

Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:31 AM

तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणी पूर्व कामांना गती देताना दिसत असून हवामानशास्त्र विभागाच्या वतीने यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

भ. के. गव्हाणेबार्शी : तालुक्यातील शेतकरीखरीप पेरणी पूर्व कामांना गती देताना दिसत असून हवामानशास्त्र विभागाच्या वतीने यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली असून शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीस लागला आहे.

रोहिणी नक्षत्राला २५ मेपासून प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर कोणते नक्षत्र केव्हा व त्याचे वाहन कोणते, यावर नियोजन करीत आहेत. मोबाइल अॅपपर्यंत प्रगती झाली असली, तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचांग काढतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो.

खरीप हंगामात त्या-त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुख दुःखाचे चक्र सुरू ठेवते, असा समज आहे. यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून, तर चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवित झाली आहे.

मागील वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, या विषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज फेल ठरले गेले. परिणामी, पेरणी व मशागतीची वाताहत झाली, तर कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले.

मागील वर्षी एक महिना उशिरा पाऊस झाला, याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाल्याने कमी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले.

असे आहेत नक्षत्र व त्यांचे वाहन

दिनांकनक्षत्रवाहन
०७ जूनमृगकोल्हा
२१ जूनआर्दामोर
०५ जुलैपुनर्वसूहत्ती
१९ जुलैपुष्यबेडूक
०२ ऑगस्टआश्लेषागाढव
१६ ऑगस्टमघाकोल्हा
३० ऑगस्टपूर्वाउंदीर
३० ऑगस्टउत्तराहत्ती
२६ सप्टेंबरहस्तमोर
१० ऑक्टोबरचित्राम्हैस

अधिक वाचा: Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात?

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसशेतकरीशेतीपेरणीखरीप