Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pune Weather : पुणे जिल्ह्यांत येणाऱ्या चार दिवसांत पडणार 'इतका' पाऊस! काय आहेत इशारे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 22:47 IST

Pune Rain Updates : पुणे परिसरामध्ये जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांतही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पुणे : मान्सूनच्या पावसाचे आगमन होऊन एक महिना उलटला आहे. पुणे परिसरामध्ये जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांतही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

(Pune Latest Weather and Rain Updates)

मागील आठवडयाचे हवामानपुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २८.८ ते ३०.६ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २३.६ ते २४.४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ९० टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ४.४ ते ८.५ किमी. होता.

पावसाचा अंदाजपुढील चार दिवसांत पुणे जिल्ह्यांमध्ये कमीजास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ७ जुलै रोजी ४५ मिमी, ८ जुलै रोजी १९ मिमी, ९ जुलै रोजी २० मिमी आणि १० जुलै रोजी २७ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २१ ते २९ क.मी. दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्तेकडून ईशान्येकडे राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊस