Join us

राज्यात दहा जिल्ह्यांना दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2023 11:24 IST

हवामान विभागाने आज व उद्या दि. १७ 'ऑरेंज अलर्ट' दिला असून, अमरावती जिल्ह्यात 'रेड अलर्ट' सांगितला आहे.

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. १६) व रविवारी (दि. १७) हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' दिला असून, अमरावती जिल्ह्यात 'रेड अलर्ट' सांगितला आहे, तर वर्धा, नागपूर, औरंगाबाद, जालना तसेच नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट'चा देण्यात आला आहे.

उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. कोकण, गोव्यात १६ व १७ सप्टेंबरला 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. 

राज्यात १६ तारखेला काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवस तीव्र पाऊस होईल. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. - के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :हवामानपाऊसअमरावतीपुणे