Join us

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 26, 2024 11:06 AM

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.देशभरात पाणीटंचाईचे सावट ...

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

देशभरात पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. बंगलुरु शहरात तर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील सहा महसूल विभागात सरासरी  ३९.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात नागपूर ५०.१७%, अमरावती ५१.१९, नाशिक ३९.९९, पुणे ३९.८१, कोकण ५२.२३ तर औरंगाबाद विभागात २०.५५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ २२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून (४९४.१८ दलघमी) १७.४ टीएमसी एवढा जिवंत पाणीसाठा उरला आहे. 

बीडच्या माजलगाव धरण शुन्यावर पोहोचले असून  मांजरा धरणात अर्धा टीएमसी पाणी शिल्लक आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात १८.१६ टक्के म्हणजेच ६.५१ टीएमसी तर येलदरी धरणात १५ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

नांदेडच्या निम्न मानारमध्ये ३२.१० टक्के पाणी शिल्लक असून १.५ टीएमसी एवढा धरणसाठा उरला आहे. धाराशिवच्या तेरणा धरणात ४.२४ टक्के म्हणजेच १.१९ टीएमसी पाणी राहिले असून इतर बहुतांश धरणे शुन्यावर जाऊन पोहोचली आहेत.

परभणीच्या निम्न दुधना धरणात ८.३९ टक्के म्हणजे शुन्य टीएमसी पाणी उरलं आहे. परिणामी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :धरणपाणीमराठवाडाबेंगळूरपाणी टंचाई