Join us

Monsoon Rain Maharashtra Entry : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अखेर मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 21:00 IST

महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.

 मान्सूनच्या पावसाने आज अखेर महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश केला असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मागच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने बऱ्याच भागात दुष्काळ होता. पण यंदा हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी आनंदात आहेत.

मान्सून कुठपर्यंत पोहोचला?मान्सून आज कर्नाटक, आंध्रप्रदेश चा काही भाग काबीज करत गोव्यातून महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी पर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत प्रवेश केला. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.                     

 मान्सूनची आजची प्रगती पाहता खान्देश विदर्भ पर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? आजपासुन, सोमवार दि. १० जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान दक्षिण अर्ध महाराष्ट्रातील सोलापूर सांगली तसेच पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा जालना बीड धाराशिव लातूर पर्यंतच्या ९ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता जाणवते.  

मान्सून जेथे पोहोचला त्याच्यापुढे खरं तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. परंतु त्या पद्धतीने कोसळताना जाणवत नाही. त्यामुळे मान्सूनची प्रगती होतेय पण ती दमदारपणे होतांना दिसत नाही. शिवाय मान्सूनी बंगालच्या उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसापासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्यामुळे दिवसागणिक आतापर्यंतची मान्सूनची प्रगती व त्यामागे झालेला पाऊस ही कामगिरी काळजीपूर्वक जोखली जात आहे. 

१५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तेथे मान्सून पूर्व वळीव पावसाची अपेक्षा करू या!              उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून महाराष्ट्रात जिल्हावार जोरदार पावसाची तीव्रता कधी- कधी असू शकते.मुंबईसह संपूर्ण कोकणात उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार दि. १४ जूनपर्यंत तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा १० जिल्ह्यात उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. ११ जून पर्यन्त मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उद्या व परवा शुक्रवारआणि शनिवारी दि. ७ व ८ जून ला दोन दिवस विदर्भातील ११ जिल्ह्यात आज व उद्या, ६-७ जूनला, अश्या पद्धतीने महाराष्ट्रात जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र पावसाची ही कामगिरी अतिजोरदार असू शकते. 

वरील तारखानंतर जून महिन्यात जेथे पोहोचला तेथे मोसमी व नाही तेथे पूर्व मोसमी मध्यम पावसाची शक्यता ही मात्र कायम आहे.  काही बदल दिसल्यास दिवसागणिक तसे अपडेट देता येईल. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान