Join us

Monsoon Rain : राज्यात आत्तापर्यंत किती बरसला मान्सूनचा पाऊस? पाहा सविस्तर आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 21:34 IST

मान्सूनच्या पावसाचा जोर मागच्या काही दिवसांपासून कमी झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पुणे : मान्सूनच्या पावसाने राज्यातील सर्व जिल्ह्यांत हजेरी लावली असून शेतकरी पेरण्यांच्या तयारीला लागले आहेत. तर १५ जूननंतर राज्यातील मान्सूनच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र होते. पुन्हा मागच्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांना दिलासा मिळाला आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. 

दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरीपेक्षा १०१ टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंतच्या पावसाची सरासरी ही १८७ मिमी एवढी असून सध्या १८९ मिमी पाऊस पडला आहे. तर कोकणामध्ये सर्वांत जास्त म्हणजे ५०१ मिमी पाऊस पडला आहे. 

राज्यात कुठे किती पडला पाऊस?

  • नाशिक विभाग - १४१ मिमी
  • पुणे विभागात - १९५ मिमी
  • छत्रपती संभाजीनगर विभागात - १७२ मिमी
  • अमरावती विभागात - १३६ मिमी
  • नागपूर विभागात सर्वांत कमी - ९३ मिमी 

एकूण सरासरीच्या तुलनेत राज्यात १८९ मिमी पाऊस पडला आहे. तर ज्या परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे अशा भागांत शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाऊसमोसमी पाऊस