Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पुढील पाच दिवस पूर्वमोसमी पावसाची हजेरी, तुमच्या जिल्ह्यात राहणार का पाऊस?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 4, 2024 14:07 IST

Rain Update Marathwada: वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

राज्यात हवमाान विभागाने ठिकठिकाणी पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्हयात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उद्यापासून कोणत्या जिल्ह्यात कधी राहणार पाऊस?

दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्हयात दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयातदिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे.मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :पाऊसमराठवाडाहवामान