Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Weather : थंडीचा पारा अजून घसरणार; नववर्षात पहिले पाच दिवस थंडीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:46 IST

maharashtra cold weather मुंबईच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असून, सोमवारी किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले.

मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असून, सोमवारी किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले.

मात्र, नवर्षाच्या सुरुवातीला पहिले पाच दिवस किमान तापमानाचा पारा खाली घसरणार आहे.

मुंबईचे किमान तापमान १५, तर महामुंबईमधील शहरांचे १२ आणि राज्यभरातील किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.

मुंबईकरांना सध्या थंडीचा फिल येत नसला तरी महामुंबईसह राज्यभरात बऱ्यापैकी गारवा टिकून आहे.

मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशी शहरे १० अंशांवर स्थिर आहेत, तर विदर्भात सर्वच शहरांचे किमान तापमान १० वर स्थिर आहे.

राज्यात गारवा असला तरी मुंबईकरांना नव्या वर्षाचे स्वागत थंडीने करता येणार आहे.

किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येमुंबई - १७नाशिक - ९.८ठाणे - १९माथेरान - १६.६सांगली - १२.४अहिल्यानगर - ७.७कोल्हापूर - १४.५जेऊर - ९.५छत्रपती संभाजीनगर - १०.५गोंदिया - ८.८सातारा - १०.८नागपूर - ९.६

अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Winter: Temperature to Dip Further; Coldest First Five Days.

Web Summary : Mumbai's temperature slightly rose, but a significant drop is expected in the New Year's first five days. Mumbai may see 15°C, surrounding areas 12°C, and state 7°C. Northern Maharashtra is around 10°C, while Vidarbha remains steady at 10°C.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानविदर्भमुंबईनववर्ष 2026