Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आज पावसाचा इशारा दिला आहे. (weather warning)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. (weather warning)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने राज्यात सध्या पावसाला पोषक असे वातावरण आहे. काही भागांमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (weather warning)
राज्यात एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा अधिक असतो आणि उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसतात. मात्र, यंदाचे हवामानाचे चित्र बिघडले आहे. (weather warning)
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये सातत्याने पावसाच्या सरी बरसल्या. तर काही भागांमध्ये ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्याचेही चित्र पाहायला मिळाले. (weather warning)
राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकीकडे पाऊस पडतोय तर विदर्भातील काही भागांमध्ये पारा उच्चांकीकडे जाताना दिसत आहे. (weather warning)
या भागात अवकाळीचा इशारा
लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा या भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे उकडा तर दुसरे वादळी पावसाचा अलर्ट वाचा सविस्तर