Join us

Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर होणार यंदा दिवाळीतही पाऊसधारा बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 09:21 IST

पश्चिम बंगालवर धडकलेल्या Dana Cyclone 'दाना' या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालवर धडकलेल्या 'दाना' या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

विशेषतः सायंकाळच्या वेळेला पाऊस पडेल, असेही अभ्यासकांनी सांगितले. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालला धडकलेल्या 'दाना' या चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात दि. २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील.

दि. २५ व २६ ऑक्टोबरला वातावरण थंड असेल. मात्र, विशेष थंडी जाणवणार नाही. तर, हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारसह शनिवारी आणि रविवारी रात्री व पहाटे आल्हादायक वातावरण राहील.

सोमवारनंतर ऐन दिवाळीत मुंबईसह कोकणात व राज्यात सायंकाळच्या वेळेत पावसाची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरनंतरच थंडीचे वातावरण तयार होईल.

टॅग्स :पाऊसहवामानचक्रीवादळदिवाळी 2024मुंबई