मुंबई : मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.
राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६ अंश नोंदविण्यात आले. बुधवारी यात १ अंशाची वाढ झाली असली, तरी गारवा कायम आहे.
पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानाचा हा ट्रेंड कायम राहील, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे किती आहे थंडी?अहिल्यानगर : ९.४नाशिक : १०.६परभणी : ११.६जळगाव : ११.७नागपूर : ११.७महाबळेश्वर : ११.८गोंदिया: ११.९सातारा : १२छत्रपती संभाजीनगर : १२.२नंदुरबार : १२.८मालेगाव: १२.८वर्धा : १३.५बुलढाणा : १३.६अकोला : १३.६चंद्रपूर : १३.८धाराशिव : १४अमरावती : १४.१सांगली : १४.४सोलापूर : १५.२कोल्हापूर : १५.५अलिबाग : १५.८मुंबई : १७.६रत्नागिरी : २०.५पालघर : २२.४
पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही, मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेचे आहे. - प्रमुख, हवामान विभाग, पुणे