Join us

Maharashtra weather Update: किनारपट्टीवर उष्ण- दमट, विदर्भात या जिल्हयांना मुसळधार पावसाचा अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 1, 2024 09:23 IST

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही वर्तवला पावसाचा अंदाज

राज्यात उष्णतेचा कहर होत असून उन्हाचा चटका वाढला आहे. राज्य मान्सूनची आतूरतेने वाट पहात आहे. दरम्यान, राज्यात विदर्भात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यात तापमान उष्ण राहणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे विदर्भात नागरपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट असून भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्णतेची लाट- नागपूर, वर्धा, चंद्रपूर

उष्ण व दमट- रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर

पाऊस- भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधूदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

 

टॅग्स :हवामानमहाराष्ट्रविदर्भ