Join us

'ख्रिसमसला थंडी व नववर्षाला ढगाळ वातावरणाची सलामी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 21:32 IST

३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यानच्या ३ दिवसात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

डिसेंबर २२ च्या प. झंजावातातून सध्या ख्रिसमसला थंडीचा अनुभव येत आहे. २९ डिसेंबरला पुन्हा एक नवीन प. झंजावातातून वर्षाखेर ३० डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवेल. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान १२ डिग्री से. ग्रेडच्या तर मुंबईसह कोकणात हे १७ डिग्रीच्या आसपास असू शकते.                

परंतु २९ डिसेंबरला उत्तर भारतातून येणाऱ्या प. झंजावातातून जमिनीपासून उच्च पातळीवर थंडी व दक्षिण भारतातून महाराष्ट्रपर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलाफातून फक्त मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक नगर ते सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात व धाराशिव, लातूर अशा १२ जिल्ह्यात ३१ ते २ जानेवारी ह्या तीन दिवसा दरम्यानच्या नववर्षात ढगाळ वातावरण जाणवेल. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून ऊबदारपणा जाणवेल.

मध्य महाराष्ट्रातील ह्या १० जिल्ह्यात पावसाची शक्यता फारच कमी असून झालाच तर मध्यप्रदेश लगत खान्देशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यानच्या ३ दिवसात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

- माणिकराव खुळे, Meteorologist (Retd.) IMD Pune.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान