नाशिक : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वेगाने वाढू लागली आहे. कमाल-किमान तापमानात आलेख वाढू लागल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाही आटण्यास सुरुवात झाली आहे. वेगाने बाष्पीभवन होऊन जलसाठे खालावू लागले आहे. मागील दहा ते बारा दिवसांत साडेतीन ते चार टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे. जिल्ह्यात ४६.११ टक्के इतका एकूण पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
नाशिक जिल्ह्यात लहान-मोठे एकूण २६ जलप्रकल्प आहेत. यामध्ये सात प्रकल्प मोठे असून, गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे, कडवा, चणकापूर, गिरणा या धरणांचा यामध्ये समावेश होतो. मागीलवर्षीच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत ३४.७३ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. यावर्षी त्यापेक्षा काही टक्के जास्त आहे; मात्र उन्हाचा तडाखादेखील वाढू लागल्याने बाष्पीभवनसुद्धा वेगाने होऊ लागले आहे.
पाणीपातळी कमी होत असून, जिल्ह्यात मागीलवर्षी हंगामात ७७२.२ मिमी इतका पाऊस पडला होता. २०२४ सालातील पर्जन्यमानाच्या तुलनेत हे पर्जन्यमान जवळपास तीनशे मीलिमीटरने कमी राहिले होते. पाणीसाठ्यांमधून कालव्यांद्वारे शेतीसाठी आणि एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठीही आवर्तने सोडले जातात.
तसेच, पिण्याच्या पाण्याची गरजही भागविली जाते. जलसाठ्यांमधील पाणीसाठा हा चालू महिन्याचा पंधरवडा आणि पुढील मेचा संपूर्ण महिनाभर पुरवायचा आहे. मेमध्ये उन्हाची तीव्रता यापेक्षाही जास्त वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता ज्या वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने पुढील काही दिवसांत बाष्पीभवन होऊ शकते.
शहराला रोज ७००-७२० 'एमएलडी' लागते पाणीनाशिक शहराला गंगापूरसह गौतमी, कश्यपी, मुकणे या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दररोज नाशिककरांची तहान भागविण्यासाठी तब्बल ७०० ते ७२० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. गंगापुर धरणाचा पाणीसाठा ५७ टक्क्यांवर टिकून आहे. मागील वर्षांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी हा साठा कमी झाला आहे. उर्वरित करंजवण, दारणा, कड़वा, चणकापूर, गिरणा या धरणांमधील पाणीसाठा निम्यावर आला आहे.
मार्चपासून घट सुरूमार्चच्या पहिल्या आठवड्यात ऊन तापले होते. सलग कमाल तापमान ३६ ते ४० अंशांच्या जवळपास स्थिरावत होते. जिल्ह्यात कमाल तापमानाने चाळिशीही ओलांडली होती. यामुळे साठ्यांमधील पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये बाष्पीभवन अधिक वाढले असून, पुढील महिन्यात त्यामध्ये अधिक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Web Summary : Nashik's dams are drying up due to intense heat, with water levels decreasing significantly. Gangapur Dam retains 57% capacity, but others are nearing half. Efficient water use is crucial.
Web Summary : नाशिक में भीषण गर्मी से बांध सूख रहे हैं, जल स्तर तेजी से घट रहा है। गंगापुर बांध में 57% क्षमता है, लेकिन अन्य आधे के करीब हैं। कुशल जल उपयोग महत्वपूर्ण है।