Join us

Vidarbha Monsoon Update: शेतकऱ्यांनो, आता पेरणी म्हणजे उलटणीची शक्यता! जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:55 IST

Vidarbha Monsoon Update: आभाळ दाटून आले, दोन सरी आल्या, शेतात ओल दिसली... आणि शेतकऱ्याच्या मनात पेरणीचा विचारही उमटला. पण थांबा! हे मान्सूनचं आगमन नाहीच अजून. उलट अशा पावसावर भरोसा ठेवल्यास पेरलेलं बी वाया जाईल. म्हणूनच कृषी विभाग सांगतो आहे. "पेरणीची घाई करू नका, थांबा मृग नक्षत्राची वाट पहा!" वाचा सविस्तर (Vidarbha Monsoon Update)

Vidarbha Monsoon Update : आभाळ दाटून आले, दोन सरी आल्या, शेतात ओल दिसली... आणि शेतकऱ्याच्या मनात पेरणीचा विचारही उमटला. पण थांबा! हे मान्सूनचं आगमन नाहीच अजून. (Vidarbha Monsoon Update)

उलट अशा पावसावर भरोसा ठेवल्यास पेरलेलं बी वाया जाईल. म्हणूनच कृषी विभाग सांगतो आहे. "पेरणीची घाई करू नका, थांबा मृग नक्षत्राची वाट पहा!" (Vidarbha Monsoon Update)

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षित वेळेपेक्षा लवकर झाले असले तरी विदर्भात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या हवामान स्थितीचा विचार करता विदर्भातील शेतकऱ्यांनी अजून पेरणी करू नये, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने केले आहे. कारण अशा स्थितीत पेरणी केल्यास पीक "उलटण्याची" शक्यता अधिक आहे. (Vidarbha Monsoon Update)

मान्सूनचा वेग मंदावणार

यावर्षी मान्सूनने महाराष्ट्रात २५ मे रोजीच आगमन केले. कोकणात पावसाने हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे येण्यासाठी त्याचा वेग २७ मेपासून कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

त्यानुसार विदर्भात किमान ५ जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नाही. यामुळे आगामी दिवसांत पावसाची उणिव जाणवणार आहे.

मे अखेरपर्यंत कोरडे हवामान

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज (२७ मे)पासून कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून, तापमानातही थोडी वाढ होऊ शकते. मे अखेरपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे जमिनीतील ओलसरपणा टिकणार नाही आणि पेरणी केल्यास बीज उगवण झाल्यावर पाणी न मिळाल्यामुळे पिके नष्ट होण्याची भीती आहे.

मृग नक्षत्राची प्रतीक्षा करा

शेती परंपरेनुसार, शेतकरी मृग नक्षत्रात पेरणीस सुरुवात करतात. यंदा मृग नक्षत्र ८ जून रोजी सुरू होत आहे. या काळात किमान ८० ते १०० मिमी पावसाची नोंद झाली, तसेच जमिनीत पुरेशी ओल असेल, तरच पेरणीस प्रारंभ करण्याचा सल्ला दिला जातो.

आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ८३ मि.मी एवढा पाऊस पडलेला असला तरी तो मान्सूनपूर्व आहे, त्यामुळे त्यावर भरवसा ठेवणे धोकादायक ठरू शकते.

पेरणीची घाई करू नका!

* ''पेरणी आता नकोच.'' सध्याच्या हवामान स्थितीचा आढावा घेत, कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना दिली आहे.

* कारण पावसाचा पुरेसा ठसा नसेल आणि पेरणी केली गेली, तर बी उगवणीनंतर कोरडवाहू हवामानामुळे पीक उलटण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी नुकसान सहन करावे लागू शकते.

* मान्सून लवकर दाखल झाला असला, तरी विदर्भात प्रत्यक्ष पेरणीसाठी अजून परिस्थिती योग्य नाही. अशा वेळी पेरणीची घाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे मृग नक्षत्राची प्रतीक्षा करा आणि पावसाचा ठोस अंदाज आल्यानंतरच पेरणी करा, हेच कृषी विभागाचे स्पष्ट संदेश आहे.

नक्षत्रांनुसार मान्सूनचे अंदाजित वेळापत्रक

नक्षत्र        तारीखवाहन
रोहिणी   २५ मे  म्हैस 
मृग   ८ जून   कोल्हा
आद्रा   २२ जून   उंदीर
पुनर्वसू   ५ जुलै   घोडा
पुष्य   १९ जुलै   मोर

हे ही वाचा सविस्तर : Monsoon 2025 : मान्सून ऑनटाइम, पण पेरणी ऑफटाइम? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसशेतकरीशेती