Join us

Nashik Rain Alert : नाशिक जिल्ह्यात सोमवारपर्यंत यलो अलर्ट, काय सांगतोय हवामान अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 19:20 IST

Nashik Rain Alert : नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची (Avkali Paus) हजेरी कायम आहे. जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वीच ...

Nashik Rain Alert : नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची (Avkali Paus) हजेरी कायम आहे. जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वीच गारपिटीनेही झोडपून काढले होते. यामुळे सुमारे तीनशेपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट अद्यापही टळलेले नाही.

हवामान खात्याकडून गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच घाटप्रदेशातसुद्धा जोरदार वादळी पाऊस (Heavy Rain) होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. दुपारी जारी करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजात येत्या सोमवारपर्यंत नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) दर्शविला गेला आहे. यामुळे ढगाळ हवामानासह तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कधीही येऊ शकतो.

तसेच चक्रीय वारे अधिक तीव्र झाल्यास ‘यलो’ अलर्ट ‘ऑरेंज’देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील पावसाची स्थिती 

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावत आहे. आज देखील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर उद्या आणि परवा देखील अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. उद्या १० मे रोजी राज्यातील बहुतांश भागात यलो अलर्ट असून तर १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट, तसेच मध्य महाराष्ट्रात – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रपाऊसशेती