Join us

Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणात किती पाणीसाठा उपलब्ध? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 20:21 IST

Nashik Dam Storage : यंदा ऑक्टोंबरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने अद्यापही धरणांची स्थिती चांगली आहे.

Nashik Dam Storage : आता नाशिककरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून नाशिककरांना पुढच्या वर्षभर मुबलक पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीपेक्षा यांना 19 टक्के अधिक पाणीसाठा आहे. धरणामध्ये 96.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) आहे. तर नाशिकला पाणी पुरवणारे गंगापूर धरणात (Gangapur Dam) 96.38 पाणी उपलब्ध आहे. 

सध्या डिसेंबर महिना सुरू असून थंडीला (Rabbi Season) चांगली सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत नाशिक जिल्ह्यातील धरणांत 96.86 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 96.38 टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी 82.49 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. 

रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. दुसरीकडे सद्यस्थितीत ढगाळ हवामानाचा काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे. दुसरीकडे धरणांचा पाणीसाठा चांगला आहे. यंदा ऑक्टोंबरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने अद्यापही धरणांची स्थिती चांगली आहे.

असा आहे पाणीसाठा 

नाशिक जिल्ह्यातील जवळपास 21 धरणे 90 टक्क्यांच्या वर आहेत. यात गंगापूर धरण 96.38 टक्के, कश्यपी धरण 99.30 टक्के, गौतमी गोदावरी धरण 69.38 टक्के, आळंदी डॅम 94 टक्के, पालखेड धरण 85.60 टक्के, करंजवण धरण 98.10 टक्के, ओझरखेड धरण 97.56 टक्के, पुणे गाव धरण 91.65 टक्के, दारणा धरण 96.28 टक्के, भावली धरण 98.54 टक्के, वालदेवी धरण 98.32 टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधारा 100 टक्के, गिरणा धरण 100 टक्के, माणिकपुंज धरण 99.76 टक्के, असा एकूण 96.86 टक्के इतका पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांचा उपलब्ध आहे.

Old Land Records : जमिनीचे जुने फेरफार, सातबारे, खाते उतारे पहा मोबाईलवर, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकशेती क्षेत्रहवामान