नाशिक : जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नांदुरमधमेश्वर प्रकल्पातून जायकवाडीकडे १ जूनपासून आतापर्यंत ४ लाख ८८ हजार ४१७ क्युसेक वेगाने ४२ हजार २१४ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीतूनही विसर्ग करण्यात आल्याने यंदा पाण्याच्या संघर्षाची चिन्हे मिटली आहेत.
१३ धरणे काठोकाठ भरलीजिल्ह्यातील भावली, वालदेवी, कश्यपी, आळंदी, वाघाड, तिसगाव, नांदुरमधमेश्वर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. याशिवाय मुकणे ९५.१८, गंगापूर २ ८२.६१ टक्के, कडवा ८५.५३, भोजापूर ८१.७२, करंजवण ८९.२२, तर ओझरखेड ९३ टक्के भरले आहे.
जून महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात ओढ दिली असून, नाशिक जिल्ह्यात महिन्यातील सरासरीच्या निम्म्या पावसाचीच नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासून ज्या भागात पाऊस नव्हता, अशा नांदगाव, सिन्नर आणि येवला तालुक्यांनी ऑगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस सुरु असल्याने धरणांमधून विसर्ग होऊन जायकवाडीकडे तब्बल ४२ टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. परंतु, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसते आहे. १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केच पाऊस...यंदा चांगला पाऊस झाला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, मागच्या वर्षी हेच प्रमाण ८६.५ टक्के इतके होते. ऑगस्ट महिन्याचा सरासरी विचार केला असता जून, जुलै महिन्यांत नांदगावमध्ये तब्बल सरासरीच्या दुप्पट पाऊस म्हणजेच १९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
Read More : आज 16 ऑगस्टपर्यंत 'ही' धरणे 100 टक्के भरली, इतर धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर