Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता १०० टक्के क्षमतेने भरले. सुरुवातीला धरणाचे ६ दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले, ज्यामुळे ५,२४१.४२ क्यूसेक्स (१४८.४४ क्यूमेक्स) पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू झाला. (Manjara Dam Water Storage)
यामुळे लातूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, मांजरा नदीच्या किनाऱ्यावरील १५२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Manjara Dam Water Storage)
महासंगावी आणि संगमेश्वर (ता. भूम) या दोन मध्यम सिंचन प्रकल्पांसह १३ कोल्हापुरी बंधारेही ओव्हरफ्लो झाले आहेत. सध्या धरणात ३,२२४ क्यूसेक्स (९१.३२ क्यूमेक्स) पाणी येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अ. ना. पाटील, नितनवरे यांनी दिली.(Manjara Dam Water Storage)
३०० हून अधिक कृषी पंप पाण्याखाली
१७ ऑगस्ट रोजी रात्री अचानक आलेल्या पावसामुळे मांजराच्या बॅकवॉटर भागातील सुर्डी, सोनेसांगावी, युसूफवडगाव, सादोळा, धनेगाव, भालगाव, बावची या सात गावांमध्ये ३०० हून अधिक कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती सोनेसांगावीचे सरपंच मुकुंद कणसे यांनी दिली.
दोन दरवाजे बंद
पोळ्याच्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता धरणाचे २ व ५ क्रमांकाचे असे दोन दरवाजे बंद करण्यात आले.त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती मांजराचे शाखा अभियंता अनुप गिरी यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सूचना
* धरणाच्या किनाऱ्यावरील गावातील रहिवाशांनी सतर्क राहावे.
* बॅकवॉटर भागातील शेतीसाठी पाणी व्यवस्थापन व पंपची स्थिती तपासावी.
* शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः पावसाळ्यातील पूरसदृश परिस्थितीत.