बालाजी आडसूळ
यंदाचे साल म्हणजे पाऊसपाणी बक्कळ! अशीच स्थिती राहिल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरच्या परतीच्या पावसावर भरणारा मांजरा प्रकल्प कधी नाही तो यंदा पहिल्यांदाच ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातच 'विसर्ग' मोडवर आला होता.
शनिवारी दुपारपासून ९८ क्युमेक वेगाने विसर्ग सुरू होता. अखेर गुरूवारी पाच वाजता शंभर टक्क्यांवर मेंटेन' करत १४८ क्युमेक इतका विसर्ग वाढवण्यात आला आहे.
बीड, धाराशिवची सीमा बनून प्रवाही होणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव (ता. केज) व दाभा (ता. कळंब) यांच्या शीवेवर १९८० साली मांजरा धरण बांधण्यात आले. याचे पाणलोट क्षेत्र बीड व धाराशिव असले तरी महसुली हिशोबात हा प्रकल्प बीडमध्ये गणला जातो तर 'लाभक्षेत्र' मोजताना लातूरकरांचा वरचष्मा दिसून येतो.
यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. अशा या प्रकल्पात मंगळवार (१२ ऑगस्ट) रोजी २२४.०९३ एकूण पाणीसाठा क्षमतेच्या तुलनेत १०९ दलघमी पाणीसाठा होता.
बुधवारी केवळ सव्वा तर गुरुवारी सकाळीपण तितकाच दलघमी येवा होता. गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी रात्रभर जोरदार पाऊस झाला. यामुळे शुक्रवारी सकाळी तब्बल २२ दलघमी येवा दाखल झाल्याने एकूण साठा १३४ दलघमीवर पोहचला.
पुढे दिवसभर व दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी साठा २०४ दलघमी अर्थात ९० टक्क्यांवर पोहचला अन् धरणावर अवलंबित्व असलेल्या लोकजीवनाची उत्सुकता संपुष्टात आली.
धरणाची स्थिती
मागील काही दिवसांत जोरदार पावसामुळे मांजरा धरण फुल्ल झाले आहे.
गुरूवारी दुपारी धरणातून १४८ क्युमेक वेगाने विसर्ग वाढवण्यात आला.
धरणाचे पाणलोट क्षेत्र बीड व धाराशिव असले तरी महसुली हिशोबात प्रकल्प बीडमध्ये गणला जातो.
विसर्गाची माहिती
शनिवारी दुपारपासून ९८ क्युमेक वेगाने विसर्ग सुरू झाला होता.
गुरूवारी पाच वाजता १४८ क्युमेक वेगाने विसर्ग वाढवण्यात आला.
धरणाचे चार वक्रद्वारे पाणी सोडण्यात आले असून आवश्यकतेनुसार आणखी दोन द्वार उंचावण्यात आले आहेत.
धरण क्षमतेचा इतिहास
धरणाची एकूण साठवण क्षमता: २२४.०९३ दलघमी (सुधारित २००४ मध्ये).
प्रकल्पाचे विसर्ग ओव्हरफ्लो इतिहास
पहिला जलसंचय: १९८० (२७ दलघमी)
सलग ओव्हरफ्लो: १९८८, १९८९, १९९०
हॅटट्रिक: २०२०, २०२१, २०२२
इतर महत्त्वाचे वर्षे: २००५, २००६, २०१०, २०११, २०१६, २०१७
धरणाचा इतिहास सांगतो की मागील ४५ वर्षांत २२ वेळा पूर्ण संचय पातळी गाठली गेली.
लाभक्षेत्रातील परिणाम
मांजरा धरणावर अवलंबित्व असलेल्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा.
पाण्याची कमतरता मिटल्याने शेतात बागायती तगणार, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित.
धरणाच्या विसर्गामुळे मांजरा नदीत ओसंडून वाहणारी पाणीप्रवाह सुरळीत.
विसर्गाची तीव्रता वाढणार
धरणाचा विसर्ग सतत पाहणीखाली ठेवला जात आहे.
पावसाच्या पुढील अंदाजानुसार विसर्गाची तीव्रता वाढवण्याची किंवा कमी करण्याची तयारी प्रशासन करत आहे.
लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना पाण्याचा मोठा दिलासा.