Join us

Manjara Dam Water Release : मांजरा प्रकल्पातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:04 IST

Manjara Dam Water Release : सलग पावसामुळे मांजरा, तेरणा व रेणापूर प्रकल्पांत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे धरणातील पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडले गेले असून, सायंकाळी १२,२३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे आसपासच्या नदीपात्रांत पाणी वाढण्याची शक्यता आहे. (Manjara Dam Water Release)

 Manjara Dam Water Release : लातूर  जिल्ह्यातील मांजरा, तेरणा व रेणापूर प्रकल्पांत पावसामुळे पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातीलपाणी पातळी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी हा विसर्ग करण्यात आला आहे.(Manjara Dam Water Release)

मांजरा प्रकल्पातून विसर्ग

शुक्रवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता मांजरा धरणाच्या दोन दारे उघडण्यात आली. नंतर काही वेळाने आणखी दोन दारे उघडण्यात आली. सायंकाळपर्यंत मांजरा नदीपात्रात सुमारे १२ हजार २३० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. (Manjara Dam Water Release)

यासाठी मांजरा धरणाचे १, ३, ४ व ६ क्रमांकाची दारे ०.२५ मीटर उघडण्यात आली आहेत. गुरुवारी आवक कमी झाल्यामुळे विसर्ग बंद ठेवण्यात आला होता, परंतु शुक्रवारी पावसामुळे आवक पुन्हा सुरू झाल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Manjara Dam Water Release)

निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग

माकणीतील निम्न तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या येव्यानुसार पाणी पातळी नियंत्रणासाठी शुक्रवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता प्रकल्पाचे एकूण ६ दारे १० सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण १२ वक्रद्वारे १० सेंटीमीटरने उघडले गेले आहेत. यामुळे नदीपात्रात सुमारे ४,५९० क्युसेक (१२८.९८ क्यूमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रेणापूर प्रकल्पातून विसर्ग

रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट ३ क्षेत्रातील पावसाच्या येव्यानुसार आणि पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता प्रकल्पाचे एकूण ४ द्वारे उघडण्यात आले आहेत.

मराठवाड्यात सलग पावसामुळे मांजरा, तेरणा आणि रेणापूर प्रकल्पांत आवक वाढल्याने पाणी पातळी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे आसपासच्या नदीपात्रांत पाणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Dam Water Level : पावसाचा परिणाम : मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Water discharge resumes from Manjara, Terana, Rena projects after rainfall.

Web Summary : Following rainfall, water discharge restarted from Manjara, Lower Terana, and Renapur projects. Manjara dam opened four gates. Lower Terana opened twelve gates. Renapur also released water to control water levels.
टॅग्स :शेती क्षेत्रमांजरा धरणधरणपाणीलातूर