Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन तासांत 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा, उर्वरित भागात कसं असेल हवामान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:36 IST

Rain Alert : असा संदेश भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पाठवण्यात आला आहे.

Rain Alert :    पुढील ३ तासांत अहिल्यानगर, कोल्हापूर, नाशिक, सातारा येथे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क रहावे,  असा संदेश भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (NDMA) मोबाईलवर पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बहुतांश भागात तापमान वाढले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्याचा काही भाग दक्षिणेकडचे जिल्हे आणि किनारी प्रदेशात किमान आणि कमाल तापमान सरासरी पेक्षा जास्त राहील. तरी हवेतील आद्रतेचे प्रमाणही वाढले आहे. सध्या राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील भंडारा, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ढगांच्या गडगडाचा सह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.  राज्यात आणखी अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे उन्हापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे काहीसे चिंतेचे वातावरण आहे. कारण काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचे नुकसान झाले. पुढचे काही दिवसही या भागात आणखी सरी बरसण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातले दक्षिणेकडचे जिल्हे आणि कोकणातही काही दिवस ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं. 

असे असेल हवामानपावसाची शक्यता पाहता नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये २३ तारखेसाठी यलो अलर्ट दिला आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीमध्ये ही वादळी पाऊस पडू शकतो तर २४ तारखेला यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. लातूर, धाराशिवमध्ये ही वादळी पावसाची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीला वर्धा आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rain alert for select districts; weather update for Maharashtra.

Web Summary : Several Maharashtra districts, including Nagpur and Yavatmal, are under a yellow alert for potential thunderstorms. Some areas may experience light rainfall. Farmers are concerned about crop damage from recent storms.
टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रपाऊस