Join us

Maharashtra Dam : रक्षाबंधनपर्यंत राज्यातील प्रमुख धरणं किती टक्के भरली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:40 IST

Maharashtra Dam : रक्षाबंधनपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांसह इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात....

Maharashtra Dam : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप (Rain) दिली आहे. मात्र सुरुवातीच्या पावसामुळे राज्यातील धरणे चांगली भरली आहेत. रक्षाबंधनपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांचं इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात....

आज ०९ ऑगस्टपर्यंत गंगापूर धरण (Gangapur Dam) ८२.३४ टक्के, जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) ९१.८९ टक्के, अलमट्टी धरण ९६.९९ टक्के, उजनी धरण ९९.७८ टक्के, कोयना धरण ८२.२९ टक्के, गोसे खुर्द धरण ४२.६५ टक्क्यांवर आहे. 

इतर धरणांचा पाणीसाठा पाहिला तर भंडारदरा धरण ८७.८० टक्के, निळवंडे धरण ९०.०८ टक्के, आढळा धरण १०० टक्के, माणिक डोह धरण ४२.०८ टक्के,  सीना आणि विसापूर धरण १०० टक्के भरले आहे 

दारणा धरण ८४.२६ टक्के, कडवा धरण ८८.६८ टक्के, पालखेड धरण ६६.३१ टक्के, करंजवण धरण ८५.३४ टक्के, गिरणा धरण ६६.५६ टक्के, हतनुर धरण २९.२५ टक्के, उकई धरण ६७.२७ टक्के, पांझरा धरण १०० टक्के भरले आहे. 

मोडक सागर धरण ९८.८० टक्के, तानसा धरण ९८.०४ टक्के, विहार धरण ७४.२७ टक्के, तुलसी धरण ८४.८४ टक्के, हेटवणे धरण ८९.२८ टक्के, चासकमान धरण ९६.०६ टक्के, पानशेत धरण ८९.५४ टक्के, खडकवासला धरण ६२.१७ टक्के, मुळशी धरण ८४.८५ टक्के, राधानगरी धरण ९४.४९ टक्के, सिद्धेश्वर धरण ७२.४९ टक्के, काटेपूर्णा धरण ५८.३७ टक्के अशी एकूण धरणांची स्थिती आहे.

- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.)

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणहवामान अंदाजपाऊस