Join us

Dam Storage : राज्यातील 50 मोठी धरणे काठोकाठ भरली, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरण पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:10 IST

Maharashtra Dam Storage : यावर्षी दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व महसुली विभागांतील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठा..

Maharashtra Dam Storage :    दरवर्षी दि.१५ ऑक्टोंबर रोजी राज्यातील सर्व धरणांमध्ये असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यांच्या आकडेवारीनुसार पुढील रब्बी सिंचन हंगाम व उन्हाळी हंगाम यामध्ये घ्यावयाच्या पिकांसाठी जलसंपदा विभागाकडून प्राथमिक सिंचन अहवाल तयार केला जातो. त्यानुसार पुढील हंगामांमध्ये सिंचन व्यवस्थापन केले जाते.

तद्नुषंगाने यावर्षी दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व महसुली विभागांतील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्या च्या आधारे पुढील रब्बी व उन्हाळी हंगामातील प्राथमिक सिंचन प्रोग्राम (P.I.P.) तयार करून सिंचन व्यवस्थापन केले जाणार आहे.

राज्यातील एकूण धरणांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, येडगाव, वडज, डिंभे, घोड, मा. ओहोळ, घा. पारगाव, सीना, खैरी, विसापूर ही धरणे १०० टक्के भरली. नाशिक जिल्ह्यातील कडवा, करंजवण, गिरणा, हतनूर, वाघूर, मन्याड, पांझरा तर मुंबई उपनगरातील तानसा, विहार, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यातील चासकमान, पानशेत, वीर, पवना तर मराठवाड्यासह विदर्भातील उजनी, जायकवाडी, धोम, अलमट्टी, येलदरी, माजलगाव, पेन, तेरणा, मांजरा, विष्णुपुरी, सिध्देश्वर, सीनाकोळे तसेच खडकपुर्णा, काटेपुर्णा, ऊर्ध्ववर्धा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित सर्वच धरणे काठोकाठ म्हणजे ९९ टक्के भरली आहेत. 

काही धरणांमधून विसर्ग काही धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच आहे. यामध्ये राजापुरबंधारा (कृष्णा) १३ हजार १२५ क्युसेक, अलमट्टी धरण १३ हजार ९८५ क्युसेक, महागाव प्राणहिता -गडचिरोली १ लाख ४२ हजार ६७३ क्युसेक, उजनी धरण १९०० क्युसेक, पंढरपूर ७ हजार ३६८ क्युसेक, गंगाखेड परभणी धरणातून ५५ हजार ३८७ क्युसेक, नांदेड जुना पूल येथून २१ हजार ११८ क्युसेक विष्णुपुरी धरणातून १७ हजार ६२२ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

- इंजि.हरिश्चंद्र.र.चकोर जलसंपदा (से.नि.), संगमनेर. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Dams Full: 50 Major Dams Overflowing, District-wise Water Storage

Web Summary : 50 major Maharashtra dams are full, prompting irrigation planning for Rabi and summer seasons. Some dams are releasing water due to high levels. Check district-wise storage details.
टॅग्स :जायकवाडी धरणधरणशेती क्षेत्रगंगापूर धरणपाऊस