Join us

Mahan Dam Water Level : महान धरणात जोरदार पाऊस; दोन वक्रद्वार उघडले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 14:29 IST

Mahan Dam Water Level : महान पाणलोट क्षेत्रात शनिवारी (२० सप्टेंबर) रोजी जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ९८.०४ टक्क्यांवर पोहोचली. वाढत्या जलसाठ्याकडे लक्ष देऊन धरणाचे दोन वक्रद्वार उघडले गेले आणि त्यातून १०२.२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला. (Mahan Dam Water Level)

Mahan Dam Water Level : महान पाणलोट क्षेत्रात शनिवारी (२० सप्टेंबर) रोजी जोरदार पावसामुळे धरणाचीपाणी पातळी ९८.०४ टक्क्यांवर पोहोचली. (Mahan Dam Water Level)

वाढत्या जलसाठ्याकडे लक्ष देऊन धरणाचे दोन वक्रद्वार उघडले गेले आणि त्यातून १०२.२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला. (Mahan Dam Water Level)

कर्मचारी व अभियंते सतत पाण्याची मात्रा नियंत्रित करत आहेत, तर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Mahan Dam Water Level)

महान धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक वादळ आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यामुळे जलाशयात पाण्याचा येवा वाढला आणि धरणाची पाणी पातळी ९८.०४ टक्के गाठली.(Mahan Dam Water Level)

दोन्ही वक्रद्वार उघडले

जलसाठ्याच्या वाढत्या पातळीमुळे धरणाचे दोन वक्रद्वार प्रत्येकी ६० सेंटीमीटर उघडण्यात आले. या दरवाऱ्यांमधून १०२.२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. 

पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गाची मात्रा आवश्यकतेनुसार समायोजित केली जात आहे. जलसाठा आणखी वाढल्यास धरणाचे अन्य दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

कर्मचारी व अभियंते सतर्क

वाढत्या जलसाठ्याकडे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंते संदीप नेमाडे आणि कर्मचारी मनोज पाठक सतत लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत. त्यांनी नदीपात्रात विसर्ग सुरळीत होईल याची दक्षता घेतली आहे.

महान परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांना पावसाळी परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Satbara Utara Correction : शेतकऱ्यांना दिलासा: महसूल विभाग गावातच करणार सातबारा दुरुस्ती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीअकोला