Republic Day Weather : उद्या व परवा सोमवार- मंगळवार दि.२६-२७ जानेवारी ला महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छ.सं.नगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती अशा ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरणाची शक्यता असुन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
नंतरची तेथील थंडी दरम्यानच्या कालावधीत व त्यानंतरही ह्या ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात, शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी पर्यंतच्या १२ दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून सध्या जाणवत असलेल्या थंडीपेक्षा तेथे कमी थंडी जाणवेल.
खालील ठिकाणी पुढील ४ दिवस थंडी कायम उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत मात्र गुरुवार दि. २९ जानेवारीपर्यंत सध्या जाणवत असलेल्या थंडीसारखीच थंडी जाणवेल. मात्र दि. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी (शुक्रवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ८ दिवसात ह्या २५ जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जाणवते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील थंडी शनिवार दि. ७ फेब्रुवारी पासुन उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता हळूहळू पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते. ह्याबाबत त्यावेळी सविस्तर खुलासा करता येईल.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.
Web Summary : Republic Day may bring cloudy weather and light rain to eleven Maharashtra districts. A slight temperature increase is expected until February 6th, reducing the cold. After February 7th, cold weather may return, excluding some northern districts.
Web Summary : गणतंत्र दिवस पर महाराष्ट्र के ग्यारह जिलों में बादल छाए रहने और हल्की बारिश की संभावना है। 6 फरवरी तक तापमान में थोड़ी वृद्धि होने से ठंड कम होगी। 7 फरवरी के बाद, कुछ उत्तरी जिलों को छोड़कर, ठंड फिर से बढ़ सकती है।