Join us

Katepurna Dam Water: पावसाचा फटका; काटेपूर्णा धरणात जलसाठा केवळ इतके टक्के वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:54 IST

Katepurna Dam Water : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला, पण काटेपूर्णा धरण अद्याप अर्धवटच भरलं आहे. अपेक्षित ७४ टक्क्यांऐवजी केवळ ३७.७३ टक्के साठा असून, ३६ टक्के तुटवड्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असले तरी पावसाच्या प्रतीक्षेत आता सर्वांची नजर आकाशाकडे लागली आहे. (Katepurna Dam Water)

Katepurna Dam Water: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला, पण काटेपूर्णा धरण अद्याप अर्धवटच भरलं आहे. अपेक्षित ७४ टक्क्यांऐवजी केवळ ३७.७३ टक्के साठा असून, ३६ टक्के तुटवड्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Katepurna Dam Water)

प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असले तरी पावसाच्या प्रतीक्षेत आता सर्वांची नजर आकाशाकडे लागली आहे.(Katepurna Dam Water)

महान येथील काटेपूर्णा धरणात जुलै अखेरच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार अपेक्षित ७४.१०२ टक्के जलसाठ्याच्या तुलनेत केवळ ३७.७३ टक्के पाणीसाठा असून, सुमारे ३६ टक्के जलसाठ्याचा तुटवडा आहे. (Katepurna Dam Water)

पावसाळ्यात प्रत्येक पंधरवड्याला जलसाठा आरक्षित ठेवण्याचा पाटबंधारे विभागाचा नियमानुसार १६ ते ३१ जुलैदरम्यान ७४.१०२ टक्के पाणीसाठा राखणे अपेक्षित आहे.(Katepurna Dam Water)

यंदा पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणीपातळी अपेक्षेपेक्षा कमी आहे. पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात २६ टक्के वाढ झाली असून, सध्याचा एकूण जलसाठा ३७.७३ टक्के इतका आहे. (Katepurna Dam Water)

वाढलेल्या पाणी पातळीमुळे तूर्तास अकोला शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सध्या पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे चित्र आहे. (Katepurna Dam Water)

धरणातील वाढत्या जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांचे मार्गदर्शनाखाली महानचे शाखा अभियंता संदीप नेमाडे, मनोज पाठक हे लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत.

चौथा व्हॉल्व्ह पाण्याखाली

२२ जुलैच्या संध्याकाळपासून धरणात पाणी झपाट्याने येऊ लागले आणि रात्रीतच पाण्याने मुख्य दरवाजाला स्पर्श केला. पाण्याची पातळी अर्धा फूट वाढली. धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचविण्यासाठी बसवलेल्या पाच व्हॉल्व्हपैकी चौथा व्हॉल्व्ह पाण्याखाली गेला असून, पाचवा व्हॉल्व्ह उघडा आहे. येत्या काही दिवसात जलसाठा वाढण्याची शक्यता आहे.

दीड महिन्यात केवळ तीन वेळा दमदार पाऊस

यंदाच्या पावसाळ्यातील दीड महिन्यात केवळ तीनवेळाच २५ जून, २१ जुलै व २२ जुलै रोजी दमदार पावसाची नोंद झाली. २१ व २२ जुलैला मालेगाव परिसरातील डव्हा, जऊळका रेल्वे, अमनवाडी, मुसळवाडी, थानोरा, फेट्रा या भागांत झालेल्या पावसामुळे महान धरणात लक्षणीय वाढ झाली आहे.

असा आहे जलाशय परिचालन आराखडा

कालावधीअपेक्षित जलसाठा (%)
१६ - ३१ जुलै७४.१०२ %
०१ - १५ ऑगस्ट८७.४५१ %
१६ - ३१ ऑगस्ट२४.८०४ %
०१ - १५ सप्टेंबर९६.७८२ %
१६ सप्टेंबरपासून पुढे१०० %

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water: जायकवाडीसाठी वैतरणेचा आधार; पुढील वर्षी मिळणार १६.५० टीएमसी पाणी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीकाटेपूर्णा धरणअकोला