Join us

20 जुलैपर्यंत राज्यातील 'ही' धरणे काठोकाठ भरली, मराठवाडा, विदर्भातील 'ही' धरणे तहानलेलीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:25 IST

Maharashtra Dam : आज 20 जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयात..

Maharashtra Dam :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून धरणांचा पाणीसाठा स्थिर असल्याचे चित्र आहे. मात्र अद्यापही मराठवाडा, विदर्भातील धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज 20 जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयात..

राज्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी जायकवाडी धरणात एकूण ८३.४० टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ७७.७६ टक्के इतका आहे. उजनी धरणात उपयुक्त जलसाठे ९४.३० टक्के, कोयना धरणात ७१.५२ टक्के, अलमट्टी धरणात ७५.८० टक्के, गंगापूर धरणात ६१.६२ टक्के, भंडारदरा धरणात ७५.५५ टक्के असा जलसाठा आहे. 

तर विभागणी आहे काही प्रमुख धरणांचा पाणीसाठा पाहायला गेलं तर निळवंडे धरणात ८७.४३ टक्के, आढळा धरण १०० टक्के, माणिक डोह २८.४२ टक्के, सीना धरण आणि विसापूर धरण १०० टक्के तसेच नाशिक विभागातील दारणा धरण ७८.७९ टक्के,  पालखेड धरण ६९.८३ टक्के, गिरणा धरण ५५.४२ टक्के, हतनूर धरण २६.२७ टक्के, पांझरा धरण १०० टक्के असा जलसाठा आहे. 

तसेच मुंबई पुणे विभागातील धरणांमध्ये मोडक सागर धरण ९९.५० टक्के, तानसा धरण ९१.४३ टक्के, भातसा धरण ८२.६६ टक्के, तिलारी धरण ८१.१७ टक्के, चासकमान धरण ८३.८६ टक्के, पानशेत धरण ८७.८९ टक्के, खडकवासला धरण ५५.५५ टक्के, मुळशी धरण ७६.८६ टक्के असा एकूण जलसाठा आहे. 

तसेच मराठवाडा विभागातील धरणांमध्ये माजलगाव धरण १०.७७ टक्के, तेरणा धरण ६८.०२ टक्के, मांजरा धरण २४.४८ टक्के, विष्णुपुरी धरण २२.७८ टक्के, गोसीखुर्द १९.९१ टक्के, खडकपूर्णा धरण १२.३८ टक्के, काटेपूर्णा धरण ३०.०८ टक्के, उर्ध्व वर्धा धरण ४८.६२ टक्के असा जलसाठा मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे.

या धरणातून विसर्ग सुरूचराज्यातील राजापूर बंधारा येथून ५५ हजार ३०० क्युसेक, कोयना धरणातून ११ हजार ४२१ क्युसेक, गोसेखुर्द धरणातून २५ हजार ७४५ क्युसेक, अप्पर वैतरणा धरणातून १२४९ क्युसेक, अलमट्टी धरणातून ८९ हजार ९९३ क्युसेक, हतनुर धरणातून ०४ हजार ५०० क्युसेक, उजनी धरणातून १६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि), संगमनेर.       

टॅग्स :जायकवाडी धरणशेतीपाऊसधरणमहाराष्ट्र