Join us

Jayakwadi Dam Water Discharge: जायकवाडी धरण अपडेट; धरणातून विसर्गात घट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:17 IST

Jayakwadi Dam Water Discharge : जायकवाडी धरणातून सुरू असलेला विसर्ग आवक घटल्याने हळूहळू कमी करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ७५ हजार क्युसेकपर्यंत गेलेला विसर्ग शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८ हजार क्युसेकवर आला. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Discharge)

Jayakwadi Dam Water Discharge : जायकवाडी धरणातून सुरू असलेला विसर्ग आवक घटल्याने हळूहळू कमी करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ७५ हजार क्युसेकपर्यंत गेलेला विसर्ग शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८ हजार क्युसेकवर आला. (Jayakwadi Dam Water Discharge)

तरीही गोदावरी पात्रातील पाणी पातळी वाढल्याने पैठणमधील घाट आणि सिद्धेश्वर मंदिर परिसर पाण्याखाली गेला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.(Jayakwadi Dam Water Discharge)

जायकवाडी धरणातून गेले आठ दिवस सातत्याने सुरू असलेला विसर्ग शुक्रवारी हळूहळू कमी करण्यात आला. गुरुवारी रात्री धरणातील आवक वाढल्याने विसर्ग ७५ हजार ४५६ क्युसेकपर्यंत गेला होता. (Jayakwadi Dam Water Discharge)

मात्र, आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून चार टप्प्यांमध्ये विसर्ग कमी करत सायंकाळी तो २८ हजार ९९६ क्युसेकवर आणण्यात आला. अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.(Jayakwadi Dam Water Discharge)

चार टप्प्यांमध्ये विसर्ग कमी

गुरुवारी संध्याकाळी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून ५६ हजार ५९२ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता आवक वाढल्याने दरवाजे चार फूट उघडून विसर्ग ७५ हजार ४५६ क्युसेक करण्यात आला. मात्र, शुक्रवारी सकाळपासून आवक घटल्याने दुपारपासून चार वेळा विसर्ग कमी करत अखेरीस २८ हजार ९९६ क्युसेकवर आणण्यात आला.

घाट व मंदिर परिसर पाण्याखाली

वाढलेल्या विसर्गामुळे पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील घाटांवर पाणी आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

तसेच गोदावरी नदीलगतचे सिद्धेश्वर महादेव मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आलेले नाही.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

धरणातून २७ हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग झाल्यास पुलाच्या वरून पाणी जाते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. 

यासाठी परिसरात सूचना फलकही लावण्यात आले आहेत. धरण परिसरात महसूल विभागासोबत पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Discharge : जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले; गोदापात्रात 'इतक्या' हजार क्युसेकने विसर्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणी