Join us

Jayakwadi Dam Update : खरीप हंगामासाठी आशेचा किरण; जायकवाडी धरणात पाण्याचा पुरेसा साठा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:44 IST

Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे नाथसागर जलाशयात यंदा मुबलक जलसाठा झाला आहे. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरण ७८.६७ टक्के भरले असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. (Jayakwadi Dam Update)

Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे नाथसागर जलाशयात यंदा मुबलक जलसाठा झाला आहे. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरण ७८.६७ टक्के भरले असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

मागील वर्षी याच दिवशी केवळ ४% साठा असताना यंदा पावसाच्या चांगल्या सुरुवातीने खरीप हंगामासाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

पावसाळ्याच्या मध्यावर असताना राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या नाथसागर जलाशयात यंदा समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला असून २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतचा एकूण साठा २४४६.०७७ दलघमी इतका झाला आहे.

त्यापैकी जिवंत साठा १७०७.९७१ दलघमी, म्हणजेच ७८.६७ टक्के क्षमतेने धरण भरले आहे. मागील वर्षी याच दिवशी केवळ ४.१३% साठा होता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे.

धरणाची तपशीलवार माहिती

घटकतपशील
धरणाची पातळी (फूटामध्ये)१५१७.८४ फूट
धरणाची पातळी (मीटरमध्ये)४६२.६३८ मीटर
एकूण पाणीसाठा२४४६.०७७ दलघमी
जिवंत साठा१७०७.९७१ दलघमी
टक्केवारीने साठा७८.६७%

पावसाचे प्रमाण आणि आजची स्थिती

आजचे पर्जन्यमान: NIL

आतापर्यंत एकूण पावसाची नोंद: १५१ मि.मी.

यामुळे धरणात पाण्याची चांगली भर पडलेली आहे. मात्र आजच्या दिवशी विशेष पाऊस झालेला नाही.

पाण्याचा वापर व पुरवठा

पैठण उजवा कालवा:

विसर्ग – १२०० क्यूसेक

वापर – २.८९०० टी.एम.सी.

डावा कालवा:

विसर्ग – ९०० क्यूसेक

वापर – २.२०१९ टी.एम.सी.

बाष्पीभवन (इतर वापर): ०.८४५ दलघमी

जलबिजली, सांडवा व सांडवा विसर्ग: शून्य

१ जून २०२५ पासून आतापर्यंतची नोंद

एकूण पाण्याची आवक : ११६२.४२६८ दलघमी / ४१.०४६१ टी.एम.सी.

सोडलेला विसर्ग : ०.०००० दलघमी / ०.०००० टी.एम.सी.

शेतकऱ्यांना दिलासा

यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार हाजेरी लावली तसेच जूनपासून नाशिक आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पातळी लवकरच पूर्ण क्षमतेने भरल्यास खरीप हंगामासाठी उपयोगी पडणार आहे. 

सध्या धरणातून कोणताही सांडवा विसर्ग नसल्याने नियंत्रित पाणीयोजना सुरू आहेत. कालव्यातून पाणी पुरवठा सुरू असून शेतीसाठी याचा मोठा फायदा होतो आहे.

नाथसागर धरणाची सद्यस्थिती पाहता पाणी टंचाईची भीती कमी झाली आहे. आगामी दिवसांत अधिक पाऊस झाल्यास धरण शंभर टक्के भरून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पूर्ण होतील. जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभाग याकडे सतत लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Update : जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत पाणी; मराठवाड्यातील २.४ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा दिलासा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीशेतकरीखरीप