Isapur Dam Water : इसापूर धरणात पाण्याची भरभराट झाल्याने अर्धापूरसह नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.(Isapur Dam Water)
यंदा हिवाळी व उन्हाळी हंगामात उस आणि केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, धरणात ८० टक्क्यांपेक्षा अधिक साठा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत आहे. (Isapur Dam Water)
नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे इसापूर धरण यंदा भरले असून यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. विशेषतः अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.(Isapur Dam Water)
धरणात पाणीसाठा वाढल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील केळी व ऊस उत्पादनाला चालना मिळेल. सध्या धरणात ८०.२३% (१०८८ दलघमी) पाणीसाठा असून, यंदा सात पाणी पाळ्यांचे नियोजन होणार आहे.(Isapur Dam Water)
१७,६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
अर्धापूर तालुक्यातील ४० ते ४२ गावांतील सुमारे १७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र इसापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणीपुरवठा सुरक्षित
इसापूर धरण फक्त शेतीसाठीच नव्हे, तर नांदेड शहरासह अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा करण्यासाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे धरण भरल्याने शहर आणि ग्रामीण भाग दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
ऊस व केळी क्षेत्रात वाढ अपेक्षित
पाण्याच्या उपलब्धतेमुळे अर्धापूर तालुक्यात ऊस आणि केळी या प्रमुख पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात या पिकांचा चांगला परतावा अपेक्षित आहे. सात पाणी पाळ्यांचे नियोजन यशस्वीरित्या पार पडल्यास क्षेत्र वाढीसह उत्पादनात मोठी भर पडू शकते.