Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gangapur Dam : नाशिकची सगळी मोठी धरणे 50 टक्क्यांच्या खाली आली, गंगापूर धरणात किती पाणी शिल्लक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:30 IST

Nashik Major Dam : पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होऊन पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. आजमितीस गंगापूर धरणात ५२.२९ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे, मागील हाच जलसाठा ५४ टक्क्यांवर होता. 

नाशिक जिल्ह्यातील एकूण २६ प्रकल्पांमध्ये ४१.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मागील वर्षी आजच्या दिवशी ३१.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आज २७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील कुठल्या धरणांत किती पाणी शिल्लक आहे, पाहुयात... 

गंगापूर धरण समूह - कश्यपी ४८.५४ टक्के, गौतमी गोदावरी ७९.१८ टक्के, आळंदी २४.१८ टक्के

पालखेड धरण समूह - पालखेड धरण  ३५.२२ टक्के, करंजवण ३३.३६ टक्के, वाघाड ९९.९५ टक्के, ओझरखेड ३९.६७ टक्के, पुणेगाव ९.७९ टक्के, तिसगाव १६.७० 

दारणा धरण ४२.५० टक्के, भावली ३३.१९ टक्के, मुकणे ४५.१० टक्के, वालदेवी ६८.८४ टक्के, कडवा २९.६२ टक्के, नांदुरमध्यमेश्वर बंधारा १०० टक्के, वाकी ४०.४१ टक्के, भोजापूर ८.८६ टक्के 

गिरणा धरण खोरे समूह - चणकापूर ४५.९८ टक्के, हरणबारी ५८.९२ टक्के, केळझर ५८.५७ टक्के, नागासाक्या २०.९१ टक्के, गिरणा ३८.१९ टक्के, पुनंद ७३.२५ टक्के, माणिकपुंज ०० टक्के, 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Dams Dip Below 50%: Gangapur's Water Levels Revealed

Web Summary : Nashik's dams are drying up due to rising temperatures. Gangapur Dam has 52.29% water left. Overall, 26 projects in Nashik district have 41.61% storage, higher than last year. Other dam levels: Kashyapi (48.54%), Gautami Godavari (79.18%), and Alandi (24.18%).
टॅग्स :गंगापूर धरणशेती क्षेत्रपाणी कपातनाशिकतापमान