Join us

Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ सात टक्के पाणीसाठा, दररोज 1.16 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 1:29 PM

जायकवाडी धरणातून दररोज बाष्पीभवन होत असून, धरणात सध्या फक्त 7.04 टक्केच पाणीसाठा राहिला आहे.

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणातून दररोज 1.16 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून, धरणात सध्या फक्त 7.04 टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे यापुढे धरणाच्या मृतसाठ्यातून शेवगाव तालुक्यातील विविध योजनांसाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात 10 मे रोजी 47.23 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी आजमितीला फक्त 7.04 टक्के पाणीसाठा राहिला आहे. येणाऱ्या काळात या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या योजनांना धरण्णाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणाच्या 42 वर्षांत केवळ सहा वेळेसच धरण 100 टक्के भरले आहे, तर 50 टक्क्यांच्या पुढे 13 वेळेस पाणी धरणात आले आहे. 2018 मध्येही मृतसाठ्चातून पाणी पुरवठा करण्यात आला होता. आता कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसून केवळ पिण्यासाठीच पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच आयकवाडी धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगर शहर, डीएमआयसी, एमआयडीसी पैठण, वाळूज, चितेगाव शेंद्रा, बिडकीनसह विविध पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो, धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे वाष्पीभवन होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

जिल्ह्यातही दुष्काळाची दाहकता

तसेच नगर जिल्ह्यातही प्रचंड दुष्काळाची दाहकता आणवत आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. उत्तरेत तरी कैनॉल किंवा तत्सम साधने आहेत. परंतु, दक्षिणेत मात्र पाण्याची वानवा जाणवत आहे. यंदाचे पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि जायकवाडीला पाणी सोडल्याने मुळा, भंडारदरामध्ये तुलनेने कमी पाणीसाठा राहिला आहे. आता आगामी पाऊस पडेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :हवामानजायकवाडी धरणपाणी टंचाईपाणी