Almatti Dam : महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे (Almatti Dam BackWater) निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी’ यांच्याकडे सोपविले आहे. या संबंधित अहवाल प्राप्त होण्यापूर्वी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दरवर्षीची पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या जीवन, मालमत्ता आणि शेतीला मोठा फटका बसू शकतो.
या पार्श्वभूमीवर, दोन्ही राज्यांतील कृष्णा नदीकाठच्या नागरिकांच्या हितासाठी कर्नाटक शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
जलाशय पातळी वाढविल्यासकृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी वाढविल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला महापुराचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात बॅक वॉटरमुळे वाढणारा पूरधोका, नदीपात्रातील गाळ साचणे, वाहतूक क्षमतेवर होणारा परिणाम आणि बंधाऱ्यांमध्ये साचणारा गाळ यासह पूरस्थितीची गंभीरता स्पष्ट केली आहे.