Join us

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:01 IST

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते. 

Maharashtra Weather Update :  आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात (Monsoon In Kerala) दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची (Avkali Paus) शक्यता जाणवते.              महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती- आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात (Monsoon Alert) दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते. शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते. 

मान्सून -केरळात मान्सून (Kerala Monsoon) २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होवु शकतो. 

अंदमानातील सध्याचा पाऊस -                                                          अंदमान व आग्नेय बंगाच्या उसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असुन त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे.              महाराष्ट्रातील तापमाने-                                             अवकाळीच्या वातावरणामुळे (Cloudy Weather) महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. अर्थात  ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी चढ-उतार जरी जाणवली तरी एकंदरीत उर्वरित मे महिण्यात दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते. हे सर्व असले तरी सध्याच्या वातावरणात एकाकी काही बदल झाला तर तसे अवगत करता येईल. 

- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune

टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रपाऊसमोसमी पाऊस