Join us

धोक्याची सूचना देणारी जायकवाडीची यंत्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2023 12:08 IST

यंत्राद्वारे नोंद घेऊन धरणाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते. जायकवाडी धरणावर मात्र, यापैकी एकही यंत्र चालू अवस्थेत नाही.

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर, जलसाठ्याच्या दाबाने धरणाच्या विविध अंगांवर होणाऱ्या सर्व परिणामांची नोंद घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रे गेल्या ४ वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभाग धरणाच्या सुरक्षेबाबत गाफील असल्याचे दिसून येत आहे.

भूकंप व भूगर्भातील अन्य घडामोडींच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणामही धरणावर होतो. अशा वेगवेगळ्या परिस्थितीला धरण कसे सामोरे जाते, हे जाणून घेण्यासाठी धरणाच्या रचनेवर पडणारा दाब मापन करणारे दाब मापक (पिझो मीटर), बांधकामावरील दाब मोजणारे 'स्ट्रेस मीटर', उताराकडील भागावर लक्ष देण्याकरिता 'स्लोप इंडिकेटर', जमिनीवरील दाब मोजणारे 'अर्थ प्रेशर 'सेल', 'पोअर प्रेशर मीटर' व भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भूकंप मापन यंत्र आदी यंत्रे धरणावर कार्यान्वित असतात.

या यंत्राद्वारे नोंद घेऊन धरणाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते. जायकवाडी धरणावर मात्र, यापैकी एकही यंत्र चालू अवस्थेत नाही. धरणावर प्लम्ब बॉब व व्ही नोट ही दोन उपकरणे फक्त चालू आहेत.

टॅग्स :धरणपाणीभूकंपपृथ्वी