Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बदलत्या हवामानाचा परिणाम; काही प्रमाणात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 08:54 IST

Maharashtra Weather Update उत्तर भारतात सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपने (वेस्टर्न डिस्टर्बन्स) उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याला अडविले आहे.

मुंबई : उत्तर भारतात सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपने (वेस्टर्न डिस्टर्बन्स) उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याला अडविले आहे.

यात भर म्हणून दक्षिण-पूर्वेकडून मुंबईसह राज्याकडे वारे वाहू लागले आहेत. या बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली असून, थंडी किंचित कमी झाली आहे.

सोमवारी या बदलत्या हवामानाचा परिणाम नोंदविण्यात आला. मंगळवारीही याचा प्रभाव राहील. यामुळे एक आकडी किमान तापमान आता दोन आकडी नोंदविण्यात येत आहे.

राज्यभरातील बहुतांशी शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बुधवारनंतर बदलत्या हवामानाचा प्रभाव कमी होईल आणि पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे गार वारे वाहू लागतील.

परिणामी बुधवारनंतर मुंबईसह राज्यातील शहरांचे किमान तापमान खाली येईल आणि थंडीचा कडाका वाढेल, अशी माहिती अश्रेय शेट्टी यांनी दिली.

किमान तापमान (अंश सेल्सियसमध्ये)मुंब- १६.९ठाणे - २०अलिबाग - २०.३अहिल्यानगर - ८.३जेऊर - ५.५छ. संभाजीनगर - ११.६डहाणू - १६नाशिक - ९.४महाबळेश्वर - १२.५धाराशिव - ११.२रत्नागिरी - १७.८सातारा - १०.९नंदुरबार - १४.१सांगली - १३.२सोलापूर - १३.९मालेगाव - ९.६कोल्हापूर  - १५परभणी - १०.६

अधिक वाचा: Saur Krushi Pump : आता दहा टक्के रक्कम भरा आणि सौर कृषिपंप मिळवा; काय आहे योजना?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: Temperature Fluctuations; Cold Weather Expected to Return Soon

Web Summary : Western disturbances are impacting Maharashtra's weather, causing temperature increases. The minimum temperature has risen. However, the weather will clear after Wednesday, with cold winds returning and temperatures expected to drop again, bringing back colder conditions.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानमुंबईमहाराष्ट्रहिवाळा