Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:10 IST

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते.

मुंबई : पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा १६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

मुंबईत गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. माथेरानचे किमान तापमान १६.८ पर्यंत घसरले.

उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशाने वाढ होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

नोव्हेंबर महिन्यातील १२ वर्षांतील किमान तापमान

दिनांकवर्षकिमान तापमान (°C)
१९२०१२१४.६
२१, २९२०१३१७.६
२७, ३०२०१४१८.२
२०२०१५१८.४
११२०१६१६.३
३०२०१७१८.०
१६२०१८१९.२
२६२०१९२०.५
१०२०२०१९.२
११२०२११९.८
२२२०२२१७.०
३०२०२३१९.७
२९२०२४१६.५

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते. - अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक 

अधिक वाचा: तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

English
हिंदी सारांश
Web Title : November's Last 12 Years: Minimum Temperatures and Lowest Recorded Temperature.

Web Summary : Mumbai's temperature plummeted to 16.2°C, a 12-year low. Jeur recorded the lowest at 7°C. North-central Maharashtra may experience a cold wave, with temperatures rising slightly in the coming days.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानपुणेमुंबईलोणावळा