नवी दिल्ली: भारतामध्ये हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून, येणाऱ्या काळात उष्णतेचा कहर अधिक वाढणार आहे.
एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार, २०४१ ते २०७० या काळात देशात अतिउष्णतेच्या दिवसांमध्ये ५० दिवसांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जर्मनी, पोर्तुगाल, ब्राझील आणि आयआयटी रूरकी येथील तज्ज्ञांनी हा संयुक्त अभ्यास केला असून, वाढती उष्णता व आर्द्रता मानवी शरीरावर गंभीर दबाव निर्माण करू शकते, असा इशारा दिला.
२०४१ ते २०७० दरम्यान मोठा बदल◼️ अभ्यासानुसार, मध्य शतकापर्यंत हवामानात मोठे बदल होतील. २१ व्या शतकाच्या अखेरीस ही स्थिती अधिक भयावह होऊ शकते.◼️ उन्हाळ्याच्या दिवसात वर्षातील ७५ पेक्षा जास्त २ दिवस असे असतील, जेव्हा 'हीट इंडेक्स' २७ अंशांच्या वर राहील.◼️ थंडीच्या काळात किनारपट्टीच्या भागांत याचा परिणाम अधिक जाणवेल, तर उन्हाळ्यात उत्तर भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल
सातत्याने का वाढतेय उष्णता?◼️ हवामान बदलामुळे तापमानात झालेली वाढ आणि विविध भागांमधील आर्द्रतेचे बदलणारे स्वरूप ही यामागची मुख्य कारणे आहेत.◼️ तज्ज्ञांच्या मते, या धोक्याशी लढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार रणनीती आखण्याची आता गरज आहे.
भविष्यातील उष्णतेच्या तीव्रतेचा अंदाज
| कालावधी | धोकादायक उष्णतेचे दिवस (२७° पेक्षा जास्त) | अत्यधिक धोकादायक दिवस (३२° पेक्षा जास्त) |
|---|---|---|
| २०४१–२०७० | ५० दिवसांची वाढ | ०५ दिवसांची वाढ |
| २०७१–२१०० | ७५ दिवस प्रती वर्ष | ७५ दिवस प्रती वर्ष |
| २०७१–२१०० | ७५ दिवस प्रती वर्ष | २० दिवस प्रती वर्ष |
अधिक वाचा: शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी फुलवली दीड कोटी उत्पन्नाची संत्रा शेती
Web Summary : India faces escalating heatwaves. A study predicts 50 more days of extreme heat by 2070. Experts warn of health risks from rising temperatures and humidity, urging regional strategies to combat the threat. Heat index will rise above 27 degrees.
Web Summary : भारत में लू का खतरा बढ़ रहा है। एक अध्ययन में 2070 तक अत्यधिक गर्मी के 50 दिन बढ़ने की भविष्यवाणी की गई है। विशेषज्ञ बढ़ते तापमान और आर्द्रता से स्वास्थ्य जोखिमों की चेतावनी देते हैं, और खतरे से निपटने के लिए क्षेत्रीय रणनीतियों का आग्रह करते हैं। हीट इंडेक्स 27 डिग्री से ऊपर जाएगा।