Join us

विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:21 IST

बर्ड फ्लू या विषाणूने आतापर्यंत डझनभर जिवांना संक्रमित केले आहे.

अंटार्क्टिकामधील सीलमध्ये बर्ड फ्लूचा अत्यंत संसर्गजन्य प्रकार प्रथमच आढळून आला आहे. पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. ब्रिटनच्या अॅनिमल प्लांट हेल्थ एजन्सी (एपीएचए) साठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दक्षिण जॉर्जियाच्या उप-अंटार्क्टिका बेटावर एलिफंट सील आणि फर सीलमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये एच५एन१ विषाणू आढळला आहे. या विषाणूने आतापर्यंत डझनभर जिवांना संक्रमित केले आहे.

भारतामध्ये करोनाकाळात पोल्ट्री प्राण्यांमध्ये हा रोग याआधी आला होता. अत्यंत सांसर्गिक रोगाने या सागरी सस्तन प्राण्यांना प्रभावित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे या प्रदेशातील अद्वितीय जैवविविधतेवर होणा-या संभाव्य परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

कधी आला संशय?

■ ऑक्टोबर २०२३ मध्ये अंटार्क्टिकाजवळ शास्त्रज्ञांना प्रथमच एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस असल्याचा संशय आला होता.

■ ब्रिटिश प्रवासी क्षेत्र दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सँडविच बेटावरील बर्ड आयलंडवर अनेक तपकिरी स्कुआ समुद्री पक्षी मरण पावले होते.

यानंतर एलिफंट सीलचा सामूहिकपणे मृत्यू होऊ लागला होता.३३ जागतिक प्रजातीं पैकी सहा प्रजाती अंटाक्टिंकामध्ये आहेत. अंटार्क्टिका हे एक अद्वितीय आणि विशेष जैवविविधता हॉटस्पॉट आहे. येथे रोगराई पसरणे अतिशय वाईट आहे. रोगराईमुळे पक्षी आणि सागरी सस्तन प्राण्यांना धोका निर्माण होईल. - इयान ब्राउन, संचालक, एपीएचए

विनाशकारी मृत्यूची भीती

  • या विषाणूमुळे लाखो पक्ष्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये एच५एन१ चा जगभरात उद्रेक झाल्यानंतर पोल्ट्री फार्मवरील लाखो पक्षी मारण्यात आले होते.
  • अंटार्क्टिकामध्ये बर्ड 3 फ्लू आढळल्याने येथे २ जिवांचा विनाशकारी मृत्यू होण्याची भीती शास्त्रज्ञांना आहे.
टॅग्स :बर्ड फ्लूआरोग्यवन्यजीव