मालेगाव : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून सकाळी ६ वाजता पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. सुरुवातीला ताशी २०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून ते हळूहळू वाढवून १००० क्युसेकपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात कोणीही जाऊ नये, तसेच नदीकाठावरील पशुधन, शेतीपंप व अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनीही आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कसमादे भागासाठी चणकापूर धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध व्हावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय सुनिश्चित व्हावी यासाठी दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान आवर्तन सोडले जाते.
जलस्तर खालावलेलाचणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे कसमादे परिसरातील पाण्याच्या टंचाईला काही प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरीही अनेक गावांमध्ये विहिरी व बोअरवेलचा जलस्तर आधीच खालावलेला आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी दिवसांत पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अद्यापही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Web Summary : Water released from Chankapur Dam for drinking; Girna riverbank residents alerted. The initial release is 200 cusecs, increasing to 1000. Residents are urged to move livestock and equipment. The release aims to ease water scarcity in Kasmade, though well levels remain low, and tanker dependence is possible.
Web Summary : चनकापूर बांध से पीने के पानी के लिए पानी छोड़ा गया; गिरना नदी किनारे के निवासियों को सतर्क किया गया। शुरुआत में 200 क्यूसेक पानी छोड़ा जा रहा है, जिसे बढ़ाकर 1000 किया जाएगा। निवासियों से पशुधन और उपकरण हटाने का आग्रह किया गया है। इस पानी से कसमादे में पानी की कमी दूर होगी, हालाँकि कुओं का जलस्तर अभी भी कम है, और टैंकरों पर निर्भरता संभव है।