Join us

धाराशिवच्या धरणसाठ्यात ठणठणाट! बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा शून्यावर 

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 16, 2024 12:45 PM

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे..

राज्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून धरणसाठ्यातील पाण्यात वेगाने घट होत आहे. सध्या राज्यात मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सर्वात कमी जलसाठा उपलब्ध असून धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडी झाले आहेत.

मागील आठवडाभरात अवकाळी पावसाची हजेरी जिल्ह्यात होती. परंतु तापमान 35 अंशाच्या पुढे गेल्याची नोंद हवामान विभागाने केली. जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून बहुतांश जलसाठे शून्यावर गेले आहेत. 

धाराशिवमध्ये सर्वाधिक जलक्षमता असणारा सीना कोळेगाव प्रकल्प शून्यावर पोहोचला आहे. तसेच निम्न तेरणा धरणात आता 1.76% पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान जिल्ह्याला उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. मात्र उजनी धरण यंदा उणे 39.57% असून 30 जूनपर्यंत आणखी अडीच टीएमसी ने पाणी कमी होऊ शकेल अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापक प्रशांत माने यांनी दिली. कोणत्या धरणात किती पाणी?गतवर्षी सीना कोळेगाव याच दरम्यान 27.87 टक्क्यांनी भरले होते. आज दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता सीना कोळेगाव मध्ये शून्य टक्के पाणी असल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली. 

निम्न तेरणा गतवर्षी 57.86 टक्क्यांनी भरले होते त्यामध्ये आता 1.76% पाणी उरले आहे. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार

जुलै महिन्यात आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी जून महिन्यात ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत पाणीपातळी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या दररोज ०.२३ टक्के पाणीपातळी कमी होत आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईपाणीकपातउस्मानाबाद