Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: January 22, 2024 11:34 IST

कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.हे वारे समुद्राच्या १.५ किमी वर वाहत आहेत.

देशभरात उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असताना महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस राज्यात हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.हे वारे समुद्राच्या १.५ किमी वर वाहत आहेत.दरम्यान, कर्नाटक आणि विदर्भ, मराठवाड्यावर ढग घोंगावत असल्याने पावसाची शक्यता आहे.

पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस विदर्भात पावसाची शक्यता असून मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Weather: पुन्हा अवकाळीचे ढग! राज्यात या भाागात पावसाची शक्यता, कसे राहणार तापमान?

पूर्व व पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात किमान तापमान पुढील काही दिवस १ ते २ अंशांनी घसरणार असून विदर्भात पुढील ५ दिवस किमान तापमानात कोणताही बदल होणार नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने  दिला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानतापमानविदर्भ