Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत पावसाची शक्यता; किमान तापमान १५ अंशाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:50 IST

वेगरिज ऑफ दी वेदर संस्थेचा अंदाज...

राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश असून, किमान तापमान १५ अंशाच्या आसपास आहे. हवामान स्थिर असतानाच येत्या आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील पावसाचा हा किंचित परिणाम असेल, अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या 'वेगरिज ऑफ दी वेदर' या संस्थेने दिली. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पडलेली थंडी वगळता मुंबईचा पारा आता चढाच आहे. तर राज्यातही तापमान फार खाली घसरलेले नाही.

कमाल तापमान

अलिबाग- ३५.४

डहाणू- ३६.८

मुंबई- ३६.८

रत्नागिरी- ३६.६

सोलापूर- ३४.४

सातारा- ३२.६

सांगली- ३२

परभणी-३२.६

नांदेड-३२.८

कोल्हापूर- ३२.३

 

टॅग्स :हवामानपाऊसदिवाळी 2023