Join us
Daily Top 2Weekly Top 5

Women Farmer Nita Dhumal : ३० गुंठे गुलाब शेतीतून आर्थिक समृद्धी मिळवणाऱ्या निताताई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 22:15 IST

गुलाब शेती म्हटलं की, आपल्याला आठवतं ते पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे. देशात आणि परदेशात गुलाबाच्या फुलाच्या निर्यातीसाठी तळेगाव हे हब मानलं जातं. पण भोर तालुक्यातील केळवडे या गावातही ८ ते १० एकरावर गुलाबाची शेती केली जाते.

Women Farmer Nita Dhumal : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे येथील निता धुमाळ या शेतकरी महिलेने गुलाब शेतीतून समृद्धी मिळवली आहे. मागील १० वर्षांपासून त्या गुलाब शेती करत असून इतर पिकांच्या तुलनेत गुलाबातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. वर्षाकाठी ५ लाख फुलांचे उत्पादन घेत ३० गुंठ्यांच्या पॉलिहाऊसमधून त्या वर्षाकाठी १० लाखांचा निव्वळ नफा कमावत आहेत.

गुलाब शेती म्हटलं की, आपल्याला आठवतं ते पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे. देशात आणि परदेशात गुलाबाच्या फुलाच्या निर्यातीसाठी तळेगाव हे हब मानलं जातं. पण भोर तालुक्यातील केळवडे या गावातही ८ ते १० एकरावर गुलाबाची शेती केली जाते. येथील ५ ते ६ शेतकरी संरक्षित (पॉलिहाऊसमध्ये) गुलाबाची शेती करतात. गुलाबाला वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे गुलाब शेती इतर पिकांपेक्षा परवडते असा इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव.

निता यांना केळवडे गावात ८ एकर शेती आहे. त्यापैकी केवळ ३० गुंठ्यात त्या गुलाबाची शेती करतात व इतर क्षेत्रावर कांदा आणि इतर पिकांची लागवड करतात. गुलाब शेती करण्यासाठी त्यांच्याकडे एक जोडपे आहे, सोबतच निता आणि त्यांचे पती धनाजी हेसुद्धा त्यांना शेती कामात मदत करतात. 

योग्य नियोजनातून चांगले उत्पादनगुलाब शेतीच्या सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनामुळे निता या ३० गुंठ्याच्या क्षेत्रातून महिन्याकाठी ४० हजार देठाच्या गुलाबांचे उत्पादन घेतात. यासोबतच विना देठाच्या गुलाबाचेही उत्पादन मिळते. सल्ल्यानुसार खते, पाणी, फवारणी अन् शेतीतील इतर कामे केली जातात.

वर्षभर चांगला दरठराविक कालावधी सोडला तर गुलाबाच्या फुलाला वर्षभर चांगली मागणी असते. व्हॅलेंटाईनचा महिना, दिवाळी, दसरा आणि लग्नसराईत गुलाबाला मोठी मागणी असते. एका बंचला ७० रूपयांपासून ४०० रूपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे इतर पिकांपेक्षा गुलाब शेतीमध्ये जास्त नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. 

उत्पन्ननिता या वर्षाकाठी ५ लाख गुलाबाचे उत्पन्न मिळवतात. सरासरी ८० रूपये बंचप्रमाणे दर पकडला तरी प्रती गुलाब ४ रूपये दर मिळतो. त्यानुसार वर्षाकाठी त्यांना २० लाखांचे उत्पन्न मिळते. त्यातून मजूर, खते, औषधे, पाणी आणि इतर खर्च वजा केला तर १० लाखांचे निव्वळ नफा त्यांना मिळतो.

शेतकरी महिलांनी नोकरीकडे न वळता शेतीलाच व्यवसायाचे स्वरूप देऊन चांगला नफा कसा कमावता येईल याचा विचार करावा असं निता सांगतात. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने निता धुमाळ यांच्या शेतीमधील नेतृत्वाला लोकमत अॅग्रोकडून सलाम! 

English
हिंदी सारांश
Web Title : Nita Dhumal: Woman farmer prospers with rose farming on 30 Gunthas.

Web Summary : Nita Dhumal, a farmer from Pune, earns substantial profit growing roses. She cultivates roses on 30 Gunthas, yielding 5 lakh flowers annually. With effective management, she earns a net profit of ₹10 lakhs, inspiring other women farmers.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेमहिला