Join us

काशिद दांपत्यांनी ४० एकर क्षेत्र भाड्याने घेवून उभारला बांबूचा हा आगळावेगळा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 1:30 PM

नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा व राहूल काशिद यांच्या मदतीने बांबू लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रीया उद्योग करण्यासाठी १० एकर क्षेत्रात 'द बांबू सेतू' नावाचा नवीन प्रकल्प सुरु केला आहे.

सूर्यकांत किंद्रेनांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षीत महिलाशेतकरी अनुराधा व राहूल काशिद यांच्या मदतीने बांबू लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रीया उद्योग करण्यासाठी १० एकर क्षेत्रात 'द बांबू सेतू' नावाचा नवीन प्रकल्प सुरु केला आहे.

नांदघूर, ता. भोर येथे महाराष्ट्रातील पहिलाबांबूच्या शेतीचा प्रकल्प असुन बांबूची शेती करणारी पहिली स्वतंत्र महिलाशेतकरी अनुराधा काशिद यांनी सुस्थितीत व्यवस्थापित आणि एकात्मिक बांबू फार्म द बांबू सेतू आहे.

भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात अतीदुर्गम भागात असलेल्या नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा आणि बांबू पर्यटन केंद्र हा प्रकल्प उदयास आला आहे.

उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशिद यांनी पती राहूल काशिद यांच्या मदतीने बांबूचे उत्पादन, लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रीया उद्योग करण्यासाठी १० एकर क्षेत्रात "द बांबू सेतू" नावाचा नवीन प्रकल्प सुरु केला आहे. "द बांबू सेतू" हे स्थानिक ग्रामीण लोकसंख्येला रोजगाराच्या संधी देत असून आणि कमाईचे प्रमुख स्त्रोत म्हणून बांबूचा स्मार्ट वापर करत आहे.

बुरुड समाजात वापरण्यात येणाऱ्या परंपरागत अवजारांऐवजी आधुनिक स्वयंचलित, उपकरणांचा वापर आता होत आहे. त्यामुळे शोभिवंत वस्तूंच्या सुबकतेत आणि टिकाऊपणात भर पडली आहे. बांबूची मजबूती आणि टिकाऊपणा हा त्याच्या उपयुक्ततेत भर टाकणारी आहे.

केवळ नांदघुर भोर नव्हे तर ठाणे, नाशिक, धुळे नंदुरबार जळगाव, अहमदनगर, रायगड, पुणे या जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील बांबूपासून बनवलेली, पांढऱ्या मातीने लिंपलेल्या, गेरूच्या रंगात आकर्षक वारली शैलीतील चित्रांनी सजवलेल्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, अंगणे, तुळशी वृंदावने, तेथील स्वच्छता, आजच्या आधुनिक रंगरंगोटी आणि फरसबंदीने नटलेल्या घरांनाही लाजवतात.

अशा बहुगुणी बांबूची शास्त्रोक्त लागवड, संगोपन, प्रक्रिया, व्यावसायिक उपयोग या अपरिचित आणि तुलनेने नवख्या क्षेत्रात पूर्णत्वाने झोकून देणारे असे काशिद दाम्पत्य. मनशांतीसाठी बांबू फार्म उभारले आहे.

भोर शहरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील असलेल्या नांदघूर गावात सुमारे ३०० लोकवस्ती आहे. काशिद दांपत्यांनी नांदघूर मध्ये ४० एकर क्षेत्र भाड्याने घेवून द बांबू सेतू नावाचा प्रकल्प सुरु केला.

त्यामधील १० एकरात बांबूची शेती करायला सुरुवात केली. नैसर्गिक बांबूची शास्त्रोक्त पध्दतीने देखभाल करून आणि नवीन रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या "द बांबू सेतू" सुमारे २० हजार बांबू असून ९ हजार बांबू तोडीला आलेले असून, नवीन ३ लाख रोपे तयार केली आहेत. यामध्ये स्थानिक मेस बांबू आणि धोपिल बांबू या दोन जातीच्या बांबूसह नवीन तीन जातींचा समावेश आहे.

नांदघूर महाराष्ट्रातील स्मार्ट बांबू व्हिलेजयेत्या काही वर्षात नांदघूर गाव एक "स्मार्ट बांबू व्हिलेज" म्हणून विकसित करण्याचे तिचे ध्येय असुन महिला कृषी उद्योजकांनी बांबू सारखे प्रकल्प हाती घेतले तर भारताच्या कृषी क्षेत्राला उज्ज्वल भविष्य मिळेल "द बांबू सेतू" हा केवळ एक व्यावसायिक उपक्रम नाही, तर हे एक पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनासाठी वचनबद्ध उपक्रम आहे. तसेच "शेतकरी ते ग्राहकचा सेतू म्हणजेच "द बांबू सेतू" असणार आहे असे अनुराधा काशिद यांनी सांगितले.

मोफत बांबू प्रशिक्षण- बांबूचे भौतिक गुणधर्म, त्यांच्या वेगवेगळ्ळ्या प्रजाती, विद्यार्थ्यांना/क्षेत्र भेट देणारे यांना गोष्टीच्या माध्यमातून तसेच प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्यांच्यात पर्यावरणाची आवड व महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच अनेक आर्किटेक्ट बांबूची (शरीरशास्त्र), परिपक्च बांबू, बांधकामासाठी आवश्यक बांबूची निवड कशी करावी तसेच त्यावर करावी लागणारी प्रक्रिया समजून घेण्यासाठी क्षेत्र भेट देत आहेत तसेच विविध बांबू शिबीरांचे आयोजन केले जात आहे.तसेच स्थानिक युवक व युवतींना बांबूच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोफत बांबू प्रशिक्षण देत आहेत. बांबूवर प्रक्रिया करून बांबूचा टिकाऊ पणा वाढविण्यासाठी मॉडर्न बुशरी पध्दतीचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची पध्दत इतर शेतकऱ्यांनी कमी खर्चात कशी मिळेल. यासाठी त्यांचे संशोधन सुरु आहे.

प्रत्येक बांबूला कलर कोड- साधारणतः तीन वर्षाचा बांबू हा परिपक्व होतो.द बांबू सेतू" मधील बांबू हे किती दिवसांचे व वर्षांचे झाले ते वय ओळखण्यासाठी आणि बांबूची तोडणी व्यवस्थापन व्हावी यासाठी प्रत्येक बांबूला कलर कोड देण्यात आले आहेत.कलर कोडसाठी लाल, पिवळ्या आणि पांढरा रंगांचा वापर करण्यात आला आहे. लाल रंग हा परिपक्च झालेल्या बांबूला लावण्यात आला आहे.पुढील वर्षी परिपक्व होणाऱ्या (म्हणजे दोन वर्षांच्या) बांबूला निळा रंग आणि दोन वर्षानंतर तोडीला येणाऱ्या बांबूला पांढरा रंग देण्यात आला आहे.त्यामुळे परिपक्व झालेले बांबूच फक्त तोडले जातात. आणि त्याच्या विक्री किवा व्यवसायिक उत्पादनामुळे आर्थिक उत्पनात वाढ होते.

अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान

टॅग्स :शेतकरीशेतीबांबू गार्डनपीकपीक व्यवस्थापनमहिलामहाराष्ट्रभोर