सुरेश गोरे
पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोगांची कास धरल्यास शेती फायदेशीर ठरू शकते, हे जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी नारायण चंद यांनी सिद्ध केले आहे.
त्यांनी आपल्या शेतात थेट मेक्सिको देशातील मूळ असलेल्या 'चिया' (सब्जा) पिकाची यशस्वी लागवड केली असून, या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी या उत्पन्नाची एक नवी वाट खुली झाली आहे.
नारायण चंद यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात चिया पिकाची लागवड केली आहे. या पिकाला खर्च अत्यंत कमी येतो. एकरी केवळ दोन किलो बियाणे लागते, ज्याचा खर्च साधारणतः १५ हजार रुपयांपर्यंत असतो. सध्याच्या बाजारभावानुसार, यातून एकरी सुमारे सव्वा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची दाट शक्यता आहे.
भावाच्या साथीने फुलवली शेती
नारायण चंद यांना या प्रयोगात त्यांचे भाऊ संतोष चंद यांची मोठी मदत मिळाली आहे. 'पारंपरिक शेतीसोबतच शेतकऱ्यांनी आधुनिक आणि बाजारपेठेची मागणी असलेल्या पिकांचे प्रयोग करायला हवेत. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल,' असा विश्वास नारायण चंद यांनी व्यक्त केला आहे.
औषधी गुणधर्मामुळे वाढती मागणी, इंदोर येथे बाजारपेठ उपलब्ध
• चिया बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे या पिकाला मोठे औषधी महत्त्व आहे. आयुर्वेदिक औषधांसह उन्हाळ्यात थंड पेयांमध्ये (सरबत) या बियांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
• सध्या महाराष्ट्रातील वाशिम आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथे या पिकासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यात या पिकाची लागवड करणारे शेतकरी अत्यंत कमी आहेत; मात्र चंद यांच्या यशामुळे शेतकऱ्यांचा कलही याकडे वाढण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : विजयरावांनी घेतले तीन एकरात हरभऱ्याचे ४१ क्विंटल उत्पादन; १.४५ लाखांचा मिळवला नफा
Web Summary : Narayan Chand from Mandwa, Jalna, successfully cultivated chia seeds, originally from Mexico, on his 1.5-acre farm. With low input costs and high market demand, he expects to earn ₹1.25 lakh, inspiring local farmers with this innovative approach. His brother, Santosh, provided significant support.
Web Summary : जालना के मांडवा के नारायण चंद ने सफलतापूर्वक चिया बीज की खेती की, जो मूल रूप से मैक्सिको से है। कम लागत और उच्च बाजार मांग के साथ, उन्हें ₹1.25 लाख कमाने की उम्मीद है, जिससे स्थानीय किसानों को प्रेरणा मिलती है। उनके भाई संतोष ने महत्वपूर्ण समर्थन दिया।