- शाहिद अली
भंडारा : शेतकरी पारंपरिक शेती निसर्गाच्या करून लहरीपणात जितके उत्पन्न मिळेल ते घेतात मात्र काहीजण याला अपवाद ठरतात. भंडारा जिल्ह्यातील बाह्मणी येथील अनंत इखार यांनी घरातील बारा बाय पन्नासच्या तळघरात मशरुमची शेती करून आर्थिक प्रगती साधली. बचत गटातील महिला व युवकांना प्रशिक्षित करून आर्थिक उन्नत्तीचा मार्ग खुला करून दिला आहे.
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने तालुक्यातील बाह्मणी येथील अनंत नारायणराव इखार या उच्चशिक्षित तरुणाने मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग आईच्या प्रेणेतून साध्य केला. कोरोनाच्या काळात ऑनलाइनद्वारे शेकडो महिला व तरुणांना काम उपलब्ध करून दिले आहे. अनंतने नागपूर येथे उच्चशिक्षण घेऊन लोकसेवा स्पर्धेच्या तयारीसाठी पुणे गाठले. मात्र मोठा मुलगा असल्याने कुटुंबातील जबाबदारी होती.
गावी परत येऊन अभ्यासासोबत शेतीव्यवसाय सोबत पूरक काही करावे, यासाठी आईची मदत घेतली. बचत गटातून आईने कृषी विभागाद्वारे मशरूम प्रशिक्षण घेतले होते. याचा प्रेरणेतून अनंत ने मशरूम शेतीला सुरुवात केली. तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळाले. मशरूम शेतीतून यशाची वाटचाळ करावी यासाठी अनंतने संपूर्णवेळ मशरूम शेतीला प्राधान्य दिला.
विविध प्रॉड्क्टची निर्मिती
व्यवसायाला प्रगतीवर आणण्यासाठी पायलेट मशरूमच्या नावाने ओळख निर्माण केली. विविध माध्यमचा फायदा घेऊन अनंत ने २०२५ साली सुरू केलेल्या या उद्योगात भरारी घेतली. मशरूम उत्पादनासोबत मशरूमपासून खाद्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, रोगप्रतिकारक सप्लिमेंट असे पंचवीस प्रॉड्क्टची निर्मिती केली आहे. महिन्याला विविध राज्यातून सुमारे चार टन मालाची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक पुरस्काराने सन्मानित
पादर्शकतेसाठी मशरूम शेती, उत्कृष्ट प्रॉडक्ट, मार्केटिंग सर्व्हिस, नियमित प्रशिक्षण, व्यवस्थापन पाचसूत्री स्तरावर कार्य सुरू आहे. उद्योगातून प्रत्येक वर्षाला चाळीस लाखाचा नफा मिळतो. अनंतला शासनाचे आणि इतर संस्थांनी अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. अनंतच्या यशाच्या वाटचालीसाठी कुटुंबातील सदस्यांची साथ सार्थक ठरली.