Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Poultry Farming : कृषीकन्येची गावरान कुक्कुटपालनात भरारी, आतापर्यंत 26 लाखांचं उत्पन्न, वाचा यशोगाथा 

Poultry Farming : कृषीकन्येची गावरान कुक्कुटपालनात भरारी, आतापर्यंत 26 लाखांचं उत्पन्न, वाचा यशोगाथा 

Latest News Farmer's daughter takes off in rural poultry farming, earns Rs 26 lakhs so far, read success story | Poultry Farming : कृषीकन्येची गावरान कुक्कुटपालनात भरारी, आतापर्यंत 26 लाखांचं उत्पन्न, वाचा यशोगाथा 

Poultry Farming : कृषीकन्येची गावरान कुक्कुटपालनात भरारी, आतापर्यंत 26 लाखांचं उत्पन्न, वाचा यशोगाथा 

Poultry Farming : घरात राहून देखील खडतर दिवसात संधीचे सोने करता येते हे अंकिता मोरे पाटील यांनी दाखवून दिले. 

Poultry Farming : घरात राहून देखील खडतर दिवसात संधीचे सोने करता येते हे अंकिता मोरे पाटील यांनी दाखवून दिले. 

 Poultry Farming :   स्वप्न पाहायला कोणतेही भांडवल लागत नाही, पण ती पूर्ण करायला मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास हवा असतो. जालना जिल्ह्यातील गोलार्पगरी गावातील अंकिता मोरे यांनी शून्यावरून सुरुवात करून कोंबड्यांच्या व्यवसायातून केवळ आर्थिक उन्नतीच नव्हे तर सामाजिक ओळखही मिळवली. 

आपल्या गावातील इतर तरुणांना व शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा हा व्यवसाय योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने कसा फायदेशीर ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण अंकिता मोरे यांनी दिले आहे.

अंकिता मोरे पाटील या कृषी पदवीधर असून आज ५ हजार गावरान कोंबड्यांचे पालन करत आहेत. कृषी पूरक व्यवसायातून देखील आर्थिक उन्नती साधता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सन २०१९-२० मध्ये कोविड १९ मुळे जग थांबलेले होते. दुकाने, वाहतूक व उद्योगधंदे पूर्णपणे थांबलेले होते. या काळात सर्व लोक घरात होते. घरात राहून देखील खडतर दिवसात संधीचे सोने करता येते हे अंकिता मोरे पाटील यांनी दाखवून दिले. 

अंकिता मोरे या वयाच्या १८ वर्षांपासून पोल्ट्री फार्म चालवत आहेत. या व्यवसायाला त्यांच्या घरच्यांनी पाठबळ दिले. अंकिता मोरे यांची वडिलोपार्जित शेती असल्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीतच रुजलेले आहे. त्यांच्या समोर जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी सौ. छायाताई मोरे यांचा मोठा आदर्श आहे. त्यांच्याकडे एकूण ३५ एकर शेती असून त्यात विविध पीके घेतली जातात. यामध्ये मोसंबी साडेचार एकरमध्ये घेतले आहे व टरबूज, सोयाबीन, ऊस या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण पिकाची लागवड केली जाते.

व्यवसायाची सुरुवात
मोरे यांच्याकडे यापूर्वी गोठा होता. जनावरांची संख्या कमी झाल्याने गोठा रिकामा असायचा त्याच गोठ्यामध्ये कुक्कुट पालन करण्याच्या उद्देशाने गोठ्याचे रूपांतर त्यांनी कुक्कुटपालनच्या शेडमध्ये केले. शेडच्या बाजूने त्यांनी जाळी लावली. चिक फीडर आणि पाणी पिण्याची टाकी आणली. पक्षी जास्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेतील लोखंडी खांबावरती शेड तयार केले आणि त्यांना यामध्ये चांगला फायदा झाला व खर्च कमी असल्यामुळे त्यांचा नफाही वाढला.

ब्रूडिंग व लसीकरण
अंकिता मोरे यांना पोल्ट्री फार्मबद्दल संपूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आणलेल्या ५०० पक्षांचे ब्रूडिंग केले. ब्रूडिंग म्हणजे २१ दिवसाचा कालावधी असतो जिथे पक्षांना पंख येईपर्यंत त्यांना उब द्यावी लागते. छोटी पिल्ले आईच्या पंखा खाली बसतात ते पोल्ट्री फार्ममध्ये शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना कृत्रिम उब देऊन मोठे केले जाते. 

या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना २ वेळा लसीकरणही करावे लागते. पहिले लसीकरण १४ व्या दिवशी व दुसरे लसीकरण २१ व्या दिवशी करावे लागते. गावरान कोंबड्यांमध्ये लसीकरणाच्या तारखा वेगवेगळ्या असतात. कोंबड्यांना गुंबोरो, लासोटा बूस्टर अशा प्रकारचे लसीकरण करावे लागते. 

अंकिता यांचे बी.एस.सी. अॅग्रीकल्चर झाल्यामुळे त्यांना या गोष्टीचे ज्ञान होते व कोविडमध्ये सर्व बंद असल्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टर येत नसत त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ५०० पक्षांना लसीकरण केले. त्यानंतर त्यांचा हळूहळू ५०० पक्षांचा प्रवास हा १५०० पक्षांवर आला व आता त्यांच्याकडे एकूण ५००० पक्षी आहेत.

पक्षी खाद्याचे नियोजन
अंकिता या स्वतः घरच्या घरी कोंबड्यांचे खाद्य तयार करतात. सुरुवातीला ते कोंबड्यांचे खाद्य बाहेरून मागवत असत पण त्यांचा खर्च परवडत नव्हता. अंकिता म्हणतात की पोल्ट्रीमध्ये जेवढा खर्च कमी करणार तेवढा नफा आपल्याला जास्त मिळतो. म्हणून त्यांनी स्वतः खाद्य बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला कोंबड्यांना मक्याचा भरडा द्यायच्या, पण त्यांनी खाद्य पदार्थांवर अभ्यास करून त्यात बदल केला. 

मक्याचा भरडा डीओसी आणि त्यात ५०% ग्रीन फॉडर म्हणजेच शेवग्याचा पाला, दुधीचा पाला आणि लसूण घास हे टाकतात. या खाद्यपदार्थात पक्षांना अतिरिक्त पोषक घटक द्यावे लागतात जसे की कॅल्शियम, प्रोटीन, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादी.

अंकिता यांनी पक्षांची देखभाल करण्यासाठी दोन मुलींना मदतनीस म्हणून ठेवले आहे. त्या पक्षांना सकाळ, दुपार, संध्याकाळ या ३ वेळेमध्ये खाद्य देतात. तिन्ही वेळेला त्यांना लसून घास बारीक करून टाकतात. एका दिवसाला या पक्षांना २.५ क्विंटल खाद्य लागते. ओला चारा आणून ते मशीनमध्ये कुट्टी करून घेतात त्यानंतर त्याचे मशीनमध्ये दाणे बनवून पक्षांना खाण्यासाठी देतात. 

अंकिता या पक्षांना मोकळ्या हवेत ठेवतात. जेणेकरून ते पक्षी शेतातील किडे अळी खाऊ शकतात. पक्षी मोकळे असल्यामुळे त्यांना आजारही लवकर होत नाही. त्यांनी त्यांच्या शेताच्या आजूबाजूला कुंपण करून माशांची जाळी लावून त्याला झटका मशीनही लावून घेतली आहे. जेणेकरून कुत्रे, मांजर आत येणार नाही. पक्षी रात्रीच्या वेळेस शेवग्याच्या झाडावर झोपतात.

ठळक वैशिष्टे
त्यांनी स्वतःचा खाद्य फॉर्म्युला विकसित केला जो ५०% खाद्य खर्च कमी करण्यास मदत करतो आणि बाजारातील कुक्कुटपालनापेक्षा अधिक पौष्टिकही आहे, जो शेतकऱ्यांना सहजपणे बनवता येतो.

मोफत प्रशिक्षण
३-४ महिन्यांत २७,०००+ शेतकऱ्यांच्या भेटी
एकात्मिक मुक्त श्रेणी पोल्ट्री मॉडेल विकसित केले.
कृषी क्षेत्रातील महिलांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शैक्षणिक भेटी
शासकीय संस्था आणि विविध कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करतात.

- आर्थिक ताळेबंद

  • आतापर्यंत झालेला खर्च १० लाख रु. कालावधी १० महिने.
  • उत्पन्न २६ लाख रु.
  • गावरान कोंबड्याची विक्री व्यवस्था सध्या जागेवरूनच होते. निर्यात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
  • स्थानिक बाजारपेठेमध्ये १५ ते १९ रु. पर्यंत दर मिळतो व निर्यातीसाठी ५० ते ८० रु. पर्यंत दर मिळतो
  • पक्षी विक्री सद्यस्थितीमध्ये ७०० रु. प्रति किलो / प्रति पक्षी या प्रमाणे दर मिळतो.
     

Web Title : कृषि स्नातक की कुक्कुट सफलता: ग्रामीण चिकन खेती से लाखों की कमाई

Web Summary : जालना की अंकिता मोरे ने कुक्कुट पालन से वित्तीय सफलता और सामाजिक पहचान हासिल की। शून्य से शुरुआत करते हुए, अब वह 5,000 मुर्गियों का प्रबंधन करती है, स्थानीय युवाओं को अपनी लाभदायक कृषि मॉडल और नवीन फ़ीड तकनीकों से प्रेरित करती है, ₹26 लाख कमाती है।

Web Title : Agricultural Graduate's Poultry Success: Earning Millions Through Rural Chicken Farming

Web Summary : Jalna's Ankita More, a कृषि graduate, achieved financial success and social recognition through poultry farming. Starting from scratch, she now manages 5,000 chickens, inspiring local youth with her profitable farming model and innovative feed techniques, earning ₹26 lakhs.