अविनाश पाईकराव
चंद्रकलाबाई प्रभूअप्पा आल्लमखाने यांचा प्रवास हा कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास याचा आदर्श उदाहरण आहे. दोन म्हशींपासून सुरू झालेल्या त्यांच्या दूध व्यवसायाने आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली आहे. (Dairy Farming)
७८ वर्षांच्या वयातही त्या कामाच्या धडपडीत असून, शेतकरी आणि महिला उद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.(Dairy Farming)
कष्टाचे बीज : दोन म्हशींपासून सुरूवात
आज नांदेडमधील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात चंद्रकलाबाई प्रभूअप्पा आल्लमखाने हे नाव प्रेरणेचे चिन्ह आहे.
७८ वर्षांच्या चंद्रकलाबाईंचा प्रवास हा मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा आदर्श आहे.
मूळचे उदगीरचे असलेले हे कुटुंब तीन पिढ्यांपासून नांदेडमध्ये वास्तव्यास आहे. कौटुंबिक वाटाघाटीत त्यांना फक्त दोन म्हशींचा ठेवा मिळाला. आणि त्या दोन म्हशींपासून त्यांनी आपले दुग्ध साम्राज्य उभारण्याची सुरूवात केली.
पारंपरिक दूध विक्री व्यवसायाच्या आव्हानांना सामोरे जाऊन चंद्रकलाबाईंनी घरोघरी दूध, दही, तूप विक्री सुरू केली.
संसाराचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या थापण्याचे काम केले, तर पती प्रभूअप्पा यांनी जनावरांसाठी चारा विक्री करून व्यवसायाला हातभार लावला.
दूध डेअरीची उभारणी आणि व्यवसायाची वाढ
कालांतराने हे दाम्पत्य जुना मोंढा भागात पत्र्याच्या शेडमध्ये 'दूध डेअरी' सुरू करण्यास सक्षम झाले. व्यवसायात गुणवत्ता आणि दर्जा जपल्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि दूध विक्रीचा दर्जा उंचावला.
पाहता पाहता व्यवसाय वाढला त्यांनी स्वतः ची जागा खरेदी करून त्यावर घर बांधले व एक पक्क्या जागेत नवे दुकान उभारले.
दोन म्हशींपासून सुरू झालेला व्यवसाय आता ६५ म्हशींच्या दुग्ध साम्राज्यात विकसित झाला आहे.
आज त्यांच्या डेअरीमध्ये दररोज २ हजार ५०० लिटर दूध विकले जाते. याव्यतिरिक्त, डेअरीमध्ये दही, तूप आणि इतर दुग्ध पदार्थांची विक्रीही होते. या व्यवसायातून महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
शेतात व फार्म हाऊसमध्ये विस्तार
चंद्रकलाबाईंनी दुग्ध व्यवसायाच्या यशावर विश्वास ठेवून अर्धापूर तालुक्यातील लहान शिवारात दहा एकर जमीन खरेदी केली आहे. त्या जमीन त्यांच्या म्हशींसाठी फार्म हाऊस म्हणून विकसित केली आहे.
या फार्म हाऊसमध्ये म्हशींची काळजी घेण्यापासून ते दूध उत्पादनाच्या दर्जापर्यंत प्रत्येक बाबीवर त्यांनी लक्ष ठेवले आहे.
वयाच्या ७८ व्या वर्षीही कामाची धडपड
वय वाढत असतानाही चंद्रकलाबाईंनी कामाची धडपड सोडलेली नाही. आजही त्या दुकान सांभाळतात, फार्म हाऊसवर जाऊन म्हशींची काळजी घेतात, शेण गोळा करतात आणि पाणी पुरवठा करतात. त्यांच्या या चिकाटीने कष्ट करण्याची प्रेरणा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचली आहे.
एकत्र कुटुंब पद्धत आणि कुटुंबाचा आधार
चंद्रकलाबाईंचे तीन मुले, नातू, पणतू असे तब्बल १९ जणांचे एकत्र कुटुंब आजही एका छताखाली राहते. त्यांनी एकत्र कुटुंब पद्धत टिकवून ठेवली आहे, जी आजच्या युगात खूपच प्रेरणादायी आहे.
मुले आणि नातवंडे देखील आता दूध व्यवसायात उतरले असून त्यांच्या मेहनतीमुळे व्यवसाय अधिक गतीने वाढत आहे.
चंद्रकलाबाईंचा प्रवास हा 'कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास' यांचा आदर्श नमुना आहे. दोन म्हशींपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता कोट्यवधींच्या उलाढालीचा साम्राज्य बनला आहे.
त्यांच्या जीवनातून शिकायला मिळते की, प्रत्येक यशाच्या मागे कष्ट आणि सातत्य असते.
चंद्रकलाबाई प्रभूअप्पा आल्लमखाने यांचा प्रवास फक्त दुग्ध व्यवसायाचा नाही, तर प्रेरणादायी संघर्ष आणि यशाची गोष्ट आहे. जी शेतकरी, महिला उद्योजक आणि नवोदित व्यवसायींना एक नवी दिशा दाखवते.
Web Summary : Chandrakalabai, a 78-year-old entrepreneur, built a multi-crore dairy business from humble beginnings. Starting with two buffaloes, she sold milk door-to-door. Now owning 65 buffaloes and a farm, her dairy processes 2500 liters daily, showcasing hard work and family values.
Web Summary : 78 वर्षीय चंद्रकलाबाई ने दो भैंसों से डेयरी व्यवसाय शुरू किया। घर-घर दूध बेचकर करोड़ों का कारोबार खड़ा किया। आज 65 भैंसों और एक फार्म की मालकिन हैं, जहाँ प्रतिदिन 2500 लीटर दूध का व्यवसाय होता है; यह मेहनत और पारिवारिक मूल्यों का प्रमाण है।